Parbhani Loksabha Constituency : जानकरांना मराठा आंदोलकांनी गावातील मारुतीचे दर्शनही घेऊ दिले नाही..

Mahadev Jankar परभणीत माध्यमाशी बोलत असतांना जानकरांना मराठा समाजाच्या तरुणांनी घोषणाबाजी करून जाब विचारला होता. हा प्रकार ताजा असतानाच पालम तालुक्यातील भोगाव येथे जानकरांना मराठा आंदोलकांनी गावात प्रवेश करु दिला नाही.
Mahadev Jankar
Mahadev Jankarsarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : रासपचे महादेव जानकर यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणे आणि प्रचार करणे अवघड झाले आहे. मराठा आरक्षण विरोधातील लढ्यात ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात जाऊन केलेली भाषणं मराठा समाज विसरायला तयार नाही. त्यामुळे जानकर यांना मराठा समाजाकडून वारंवार विरोधाचे प्रकार समोर येत आहेत.

परभणीत माध्यमाशी बोलत असतांना महादेव जानकरांना मराठा समाजाच्या तरुणांनी घोषणाबाजी करून जाब विचारला होता. हा प्रकार ताजा असतानाच पालम तालुक्यातील भोगाव येथे प्रचाराला गेलेल्या जानकरांना मराठा आंदोलकांनी गावात प्रवेश करु दिला नाही. गावच्या वेशीवर अर्धा तास जानकर गाडीत बसून होते. त्यांच्यासोबत असलेले महायुतीचे पदाधिकारी, नेते मराठा आंदोलकांची समजूत काढत होते, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

एक मराठा लाख मराठा घोषणा सुरू होत्या आणि तरुण हटायला तयार नव्हते. तेव्हा जानकरांनी आम्ही गावात प्रचार करणार नाही, फक्त आम्हाला गावातील मंदिरात जाऊन मारूतीचे दर्शन घेऊ द्या, अशी विनंती केली. पण मराठा तरुणांनी तीही ऐकली नाही. मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय तुम्हाला गावात प्रवेश नाही म्हणजे नाहीच, अशी आक्रमक भूमिका तरुणांनी घेतली.

Mahadev Jankar
Mahadev Jankar : परभणीत महायुतीचा उपरा उमेदवार? जानकरांचंही सडेतोड उत्तर; म्हणाले...

अखेर महादेव जानकर व त्यांच्यासोबत आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना माघार घ्यावी लागली. त्यांनी आपल्या गाड्या मागे घेत गावातून बाहेर जाणे पसंत केले. महादेव जानकर यांना महायुतीने परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर ते प्रचाराला लागले आहेत. प्रचारा दरम्यान जानकरांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. परंतु मराठा आरक्षणावरून समाजामध्ये असलेली संतापाची लाट अजूनही कायम असल्याचे त्यांना ठिकठिकाणी होणाऱ्या विरोधावरून स्पष्ट होते.

याआधी परभणीत माध्यमाला बाईट देत असतानाच मराठा तरुणांनी घोषणाबाजी करत जानकर यांना मराठा आरक्षणाला पाठिंबा द्या, मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी बंद करण्याची मागणी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करा, असे म्हणत तरच आम्ही तुमच्या पाठीशी राहू, अशी भूमिका घेतली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahadev Jankar
Parbhani Loksabha Constituency : जाधव की जानकर? परभणीचा बाॅस कोण होणार ?

यावर मी दिल्लीत खासदार म्हणून गेल्यावर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी घटनेत बदल करायला लावू, असे आश्वासन देत जानकरांनी स्वतःची सुटका करून घेतली होती. त्यानंतर काल पालम तालुक्यातील भोगाव येथे त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. आधीच जानकर यांच्यावर बाहेरचा उमेदवार म्हणून टीका केली जात आहे. त्यात मराठा समाजाचा होणारा विरोध त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे.

Edited By : Umesh Bambare

Mahadev Jankar
Mahadev Jankar News : भाजपने राष्ट्रवादीच्या खांद्यावर बंदूक ठेवून निंबाळकरांच्या वाटेतील माढ्यातील अडसर दूर केला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com