Sanjay Mandlik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Narendra Modi Banner : कोल्हापूर भाजपचा मंडलिकावर 'भरोसा' नाय का? थेट मोदींचेच अभिनंदन...

Sanjay Mandlik Vs Shahu Chhatrapati : मिरजकर तिकटी येथे शाहू महाराज यांच्याही अभिनंदनाचे फलक लागले आहेत. त्यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे यांचे फोटो आहेत.

Sunil Balasaheb Dhumal

Kolhapur Political News : लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर शहर व महामार्गावर अभिनंदनाचे फलक झळकले आहेत. कागल भाजपच्यावतीने महामार्गावर लावलेल्या एका फलकावर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले आहेत. तर शहरातील मंगळवार पेठ परिसरात काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अभिनंदनाचा फलक झळकला आहे.

भाजपच्या भल्यामोठ्या बॅनरवर महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा फोटो नाही. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार धनंजय महाडिक, राजे समरजितसिंह घाटगे यांना स्थान देण्यात आले. या बॅनरमुळे कोल्हापूर भाजपचा खासदार संजय मंडलिकांवर भरोसा नाय का, अशी चर्चा सुरू झाल आहे.

लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार मंडलिक विरुद्ध महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यात लढत होत आहे. हातकणंगलेत महायुतीचे विद्यमान खासदार धैर्यशील माने विरुध्द माजी खासदार राजू शेट्टी, महाविकासमधील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजीत पाटील-सरूडकर व ‘वंचित’ चे डी. सी. पाटील अशी चौरंगी लढत आहे. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होत आहे.

निकालाच्या पूर्वसंध्येलाच कोल्हापूर-कागल महमार्गावर भाजप कार्यकर्त्यांनी भला मोठा फलक लावला आहे. त्यावर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी निवड होत असल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन, असा मजकूर लिहण्यात आला आहे. पण यावर महायुतीत सहभागी अन्य नेत्यांचे फोटो नाहीत. तर उमेदवार मंडलिकांबाबत कोठेही फलक लागलेले नाहीत.

मिरजकर तिकटी येथे शाहू महाराज यांच्याही अभिनंदनाचे फलक लागले आहेत. त्यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे यांचे फोटो आहेत. `काय ती लोकसभा, काय ती विधानसभा, काय ती विधान परिषद फक्त एकच बंटी पाटील’ असा या फलकावर लिहलेला मजकूर चर्चेचा विषय ठरला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT