Udayanraje Bhosale, Atul Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : भाजपकडून सातारा लोकसभेसाठी कोण असणार? अतुल भोसलेंनी घेतलं थेट 'हे' नाव

Udayanraje Bhosle Political News : भाजपच्या वतीने खासदार उदयनराजे भोसले यांचेच नाव सातारा लोकसभेसाठी विचाराधीन आहे. त्यांनाच...

Umesh Bambare-Patil

Satara loksabha news : सातारा लोकसभेसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू असताना कराडचे भाजप नेते अतुल भोसले यांनी मात्र पक्षाकडून खासदार उदयनराजे भोसले यांचेच नाव विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले आहे. सुरेशबाबा आणि मी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नाही. पक्षपातळीवर माझ्या नावाची चर्चा झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी आज साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीसाठी अतुल भोसले साताऱ्याला आले होते. ते प्रथम जलमंदिर पॅलेस या उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानी गेले. त्यांना आपल्या गाडीतून बैठकीच्या ठिकाणी घेऊन आले. बैठकीनंतर अतुल भोसले यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

भाजपकडून लोकसभेची तुम्हाला उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा असून, त्यात कितपत सत्य आहे. या प्रश्नावर अतुल भोसले (Atul Bhosale) म्हणाले, महायुतीतून उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी करत आहे. भाजपच्या वतीने खासदार उदयनराजे भोसले यांचेच नाव सातारा लोकसभेसाठी विचाराधीन आहे. त्यांनाच निवडणूक लढवण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तिन्ही पक्षाचे नेते लवकरच निर्णय घेतील. त्याबाबतची स्पष्टतादेखील येईल. सुरेशबाबा आणि मी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नाही. पक्षपातळीवर माझ्या नावाची चर्चा झालेली नाही. मोदींच्या विचारांची व्यक्ती निवडून आणणे हीच आमची भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केलं.

(Edited By Deepak Kulkarni)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT