Prakash Ambedkar And Sharad Pawar : वंचितचा बारामतीबाबत मोठा निर्णय; आंबेडकरांची पवारांना साथ

Lok Sabha Election 2024 : शरद पवारांनी अकोल्यातून आंबेडकरांविरोधात उमेदवार देऊ नये असे काँग्रेसला सूचवले होते. मात्र काँग्रेसने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला आहे.
Prakash Ambedkar, Sharad Pawar
Prakash Ambedkar, Sharad Pawarsarkarnama

Baramati Political News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात वारंवार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. आता लोकसभा निवडणुकीत वंचितने पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. आंबेडकरांनी बारामतीतून पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. एकीकडे महाविकास आघाडीसोबत सूत जुळले नाही, तर दुसरीकडे पवारांना मदत करण्याच्या आंबेडकरांच्या निर्णयाने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत. Prakash Ambedkar Support Supriya Sule from Baramati

महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) वारंवार चर्चा केली. मात्र जागावाटपावरून त्यांच्यातील बोलणी फिसकटली. दरम्यान, आंबेडकरांनी आघाडीच्या नेत्यांवर टीकाही केली. मात्र कोल्हापूर, नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी बारामतीतून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळेंनाही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

Prakash Ambedkar, Sharad Pawar
Hemant Godse News : नाशिकवरून गोडसेंनी भाजपला सुनावलं; इलेक्टिव्ह मेरीट कुणाकडं तेच सांगितलं...

आघाडीसोबत जुळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आंबेडकरांनी आपल्या उमेदवार घोषित केले आहेत. वंचितने तीन याद्यातून 24 लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तीसऱ्या यादीत पुणे, शिरूरमधून उमेदवार दिले असले तरी बारामतीतून (Baramati) वंचितने उमेदवार दिला नाही. येथून त्यांनी सुळे यांना पाठिंबा जाहीर केल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केली आहे. वंचितच्या पाठिंब्याने सुळेंना (Supriya Sule) मोठी मदत झाल्याची चर्चा आहे.

वंचितने महाविकास आघाडीत सहभागी होऊन भाजपला रोखण्यास मदत करावी, अशी अपेक्षा शरद पवारांसह आघाडीतील नेत्यांची होती. मात्र जागावाटपावरून त्यांच्यातील चर्चा पुढे गेली नाही. दरम्यान, शरद पवारांनी अकोल्यातून आंबेडकरांविरोधात उमेदवार देऊ नये असे काँग्रेसला सूचवले होते. मात्र काँग्रेसने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Prakash Ambedkar, Sharad Pawar
Sharad Pawar News: फडणवीसांना घायाळ करण्यासाठी पवारांनी योग्यवेळी भात्यातील बाण बाहेर काढलाच; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com