Hasan Mushrif
Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Hasan Mushrif News : 'मंडलिकांची अडचण होईल असे कुणीच काही करू नका'; हसन मुश्रीफांनी कार्यकर्त्यांना सुनावले

Rahul Gadkar

Kolhapur Loksabha Election Campaign : कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीत कागल तालुक्यातील (Kagal News) महायुतीतील तीन गट एकत्र येऊन जर मताधिक्य मिळवले तर साक्षात परमेश्वर आला तरी संजय मंडलिक यांचा पराभव होऊ शकत नाही, असा ठाम विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कापशी येथे हुतात्मा चौकात झालेल्या प्रचार सभेत मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. या वेळी त्यांनी भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनादेखील कानपिचक्या दिल्या आहेत. विधानसभेचे राजकारण लोकसभेवेळी काढून मंडलिक यांची अडचण करू नका, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे.Loksabha Election updates

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या (Kolhapur loksabha Election) निमित्ताने शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार आणि उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कागल तालुक्यातील कापशी येथे मेळावा झाला. या मेळाव्यात पालकमंत्री मुश्रीफ यांनी विरोधकांना लावलेले टोले आणि महायुतीतील स्वकीयांचे काढलेले चिमटे चांगलेच चर्चेचे विषय बनले आहेत.current news about kolhapur politics

भाजपच्या कार्यकर्त्यांनाच कानपिचक्या देत त्यांनी म्हटले त्यांच्या विजयासाठी एकत्र काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कागल तालुक्यातील (Kagal News) राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदे सेना अन् समरजित घाटगे यांच्या नेृत्वावाखाली भाजपचा गट एकत्र आला आहे. माझी तिन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की, आपण एकत्रित येऊन जर मताधिक्य मिळवले तर या निवडणुकीत साक्षात परमेश्वर जरी आला तर मंडलिक यांचा पराभव करू शकत नाही, असा विश्वास पालकमंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला. Loksabha Election News 2024 Kagal Hasan Mushrif Speaking About Political Agenda.

तिन्ही गटाचे कार्यकर्ते, नेते, समजूतदार आहेत. त्यामुळे कुणी त्यांच्या बोलण्यातून, कृतीतून दुसऱ्या गटाचे कार्यकर्ते नाराज होतील आणि त्याचा परिणाम मंडलिक यांच्या मताधिक्यावर होईल, असे वक्तव्य आणि कृती करू नये. बोलण्यातून, कृतीतून काही चुकीच्या गोष्टी कार्यकर्त्यांत जाता कामा नयेत, असेही मंत्री मुश्रीफ यांनी बजावले. विधानसभेला भाजपही इच्छुक आहे. मी सहा वेळा विधानसभेच्या मांडवाखालून गेलो आहे. आता सातव्यांदाही तुम्ही माझ्यावर अक्षता टाकणार आहात, परमेश्वर आणि ज़नता पाठीशी आहे. त्यावेळी काय होईल ते होईल, परंतु मंडलिक यांची आता अडचण होईल असे कुणीच काही करू नका, असे मंत्री मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी स्पष्ट शब्दांत कार्यकर्त्यांना सुनावले आहे.Latest News on Maharashtra Politics.

Edited By : Rashmi Mane

R

SCROLL FOR NEXT