Loksabha Election 2024 : सातारच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम; कराड, पाटणचे नेते मुंबईत तळ ठोकून

Satara Loksabha Political News : सातारा लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच उमेदवारी कोणाला द्यायची यावरुन ट्विस्ट निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्ह्यातील दिग्गजांची फळी असुनही पक्षात फूट पडल्यामुळे उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे
Prithviraj Chavan, Balasaheb Patil
Prithviraj Chavan, Balasaheb PatilSarkarnama
Published on
Updated on

Satara loksabha news : सातारा लोकसभा मतदारसंघाची महायुतीची आणि महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यारुन मोठा व्टिस्ट निर्माण झाला आहे. उमेदवार कोण असणार ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. येत्या दोन दिवसांत उमेदवार जाहीर होतील अशी चिन्हे आहेत. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील कऱ्हाड-पाटण तालुक्यातील नेते कालपासूनच मुंबईत तळ ठोकून आहेत. उमेदवारीवरुन राजधानीत राजकीय खलबते सुरु आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच उमेदवारी कोणाला द्यायची यावरुन ट्विस्ट निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्ह्यातील दिग्गजांची फळी असुनही पक्षात फूट पडल्यामुळे उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक उभे राहण्यास नकार दिला. त्यामुळे पहिल्यांदाच सातारा लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार ठरविण्यासाठी खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांना साताऱ्यात यावे लागले. त्यांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्यानंतर आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सत्यजितसिंह पाटणकर, सुनिल माने यांची नावे पुढे आली. मात्र, राष्ट्रवादीच्या बालेकिल्याची उमेदवारी कोणाला द्यायची हे अद्याप जाहीर केलेले नाही.

Prithviraj Chavan, Balasaheb Patil
Ratnagiri Sindhudurg Loksabha : ''अडीच लाखांच्या फरकाने आपटणार'' विनायक राऊतांचे नारायण राणेंना चॅलेंज

दरम्यान, मागील काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत आले. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर बंद दाराआड चर्चा झाली होती. यामध्ये पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाणांना सातारा लोकसभा तुतारीच्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव पृथ्वीराज चव्हाण यांनी नाकारला.

पण, ते काँग्रेसच्या चिन्हावर सातारा लोकसभा लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने आता इच्छुकांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची तयारी सुरू केली आहे, तर खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांनाच यावेळेसही उमेदवारी द्यावी, अशी मागणीही पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

महाविकास आघाडीच्या या सर्व घडामोडीसाठी कराड-पाटण तालुक्यातील नेते कालपासुन मुंबईत तळ ठोकून आहेत. राज्याच्या राजधानीतुनच उमेदवार जाहीर होणार असल्याने सध्या जोरदार खलबते सुरु आहेत. लवकरच महाविकास आघाडीच्या उमेदवारीची घोषणा खासदार शरद पवार करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शंभुराज देसाई, नरेंद्र पाटीलही मुंबईतच

महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटाने ज्याचा सिटींग खासदार त्याची ती जागा या सुत्रानुसार साताऱ्याची जागा आमची असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे साताऱ्याची उमेदवारी अजित पवार गटाला मिळणार की भाजपला याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान सातारा लोकसभेची भाजपची उमेदवारी खासदार उदयनराजे भोसले यांना द्यावी या मागणीसाठी त्यांचे समर्थक आक्रमक आहेत.

खासदार भोसले यांनी त्यासाठी दिल्लीवारीही केली आहे. मात्र अद्याप पक्षाकडुन उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. तर आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना महायुतीकडुन उमेदवारी द्यावी अशीही मागणी होत आहे. महायुतीतील शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते पालकमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) हे ही दोन दिवसांपासुन मुंबईतच तळ ठोकुन आहेत. त्यांच्याकडुनही ते पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारीच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Prithviraj Chavan, Balasaheb Patil
Loksabha Election 2024 : लोकसभेला मातंग समाजाला डावलले; नेतेमंडळी उचलणार मोठे पाऊल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com