Jaykumar Gore, Sanjay Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan : निवडणुकांच्या तोंडावर आमदार गोरेंचा स्टंट : संजय भोसले

Jaykumar Gore आमदार गोरे यांनी कित्येक स्थानिक निवडणुकांमध्ये या भागातील गावागावात जाऊन अगणित आश्वासने दिली. आज पुन्हा तेच करताना आमदार गोरे काडीमात्र थकत नाहीत.

रूपेश कदम

Dahiwadi News : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि मुदत संपून काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नगरपरिषदा या सर्वच निवडणूकांचे बिगूल कोणत्या क्षणी वाजेल याची कल्पना असणार्‍या आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांच्या मंत्रालयामधील बैठकांची लगबग व कोट्यावधी निधी मंजूरीच्या घोषणा हा नेहमीप्रमाणे केलेला स्टंट असल्याचा घणाघाती आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचे Shivsena जिल्हाप्रमुख संजय भोसले Sanjay Bhosale यांनी केला आहे.

आज माण-खटाव, फलटणवर निधीचा वर्षाव अशा मथळ्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्या पार्श्‍वभूमीवर श्री. भोसले यांनी प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे. प्रसिध्दीपत्रकात त्यांनी म्हटले की, आमदार जयकुमार गोरे यांनी उपभोगलेल्या सत्ता काळात तसेच आमदारकीच्या साडेबारा वर्षांच्या कार्यकाळात ते जिहे-कटापूर योजनेला पूर्णत्वास नेऊ शकले नाहीत.

उत्तर माणचा बिजवडी परिसर व कारखेल पर्यंतच्या कायम वंचित, दुष्काळी एवढेच नव्हे तर कोणत्याच योजनेत नसलेल्या या भागाला पाणी वाटपात साधे समाविष्ट देखील करु शकले नाहीत ही वस्तुस्थिती व मोठी शोकांतिका आहे. आमदार गोरे यांनी कित्येक स्थानिक निवडणुकांमध्ये या भागातील गावागावात जाऊन अगणित आश्वासने दिली.

आज पुन्हा तेच करताना भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार गोरे काडीमात्र थकत नाहीत. ही भोळ्याभाबड्या जनतेची क्रूर चेष्ठा आहे. जनतेने भरभरुन दिले असताना 'देर आये, लेकिन दुरुस्त आये' या उक्तीप्रमाणे जनतेच्या जीवन मरणाच्या प्रश्नांचे भांडवल न करता जबाबदारीने काम करावे असा सल्ला संजय भोसले यांनी आमदार गोरे यांना दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT