Madha Lok Sabha Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Lok Sabha Election : रामराजेंच्या हातात घड्याळ पण मनात 'तुतारी'; रघुनाथ नाईक निंबाळकरांना विश्वास!

Chetan Zadpe

Madha News : राज्यातील सर्वात चर्चेत असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ आहे. भारतीय जनता पार्टीत असलेल्या मोहिते पाटील यांनी उमेदवारी नाकारल्यामुळे आता बंडाचे निशाण उगारले आहे. धैर्यशील मोहिते पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. यानंतर आता रघुनाथ राजे नाईक निंबाळकरांनी आपण तुतारी हाती घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ही माझी वैयक्तिक भूमिका असून रामराजेंच्या मनातही हाती तुतारी घेण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

रघुनाथ राजे नाईक निंबाळकरांनी एका वृत्त वाहिनीशी संवाध साधला. ते म्हणाले, मी आता थांबणार नाही. आमची मुलं आमच्या बरोबर येणार, तसेच रामराजे यांचे मुलगे येणार आहेत. रामराजेंना आता निर्णय घ्यावा लागेल. रामराजे यांच्या मनातही माझ्यासारखंच 'तुतारी' आहे. आमच्या तिघांवर मालोजीराजे यांचे संस्कार झालेले आहेत. या तालुक्याचं भलं ज्यामध्ये आहे, तेच त्यांच्या मनात आहे, असं सूचकपणे निंबाळकरांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोहिते पाटलांचा राजीनामा -

धैर्यशील मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर माढा लोकसभा (Lok sabha) मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा पूर्वाश्रमीचे भाजपचे कट्टर नेते उत्तम जानकर आणि मोहिते पाटील एकत्रित येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ‘लोकसभेच्या मोबदल्यात विधानसभेला मदत’ या सूत्रानुसार दोन्ही गटांत मतेक्य झाले, तर माढ्यात भाजपला पुन्हा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT