Satara NCP News : संघर्षाच्या काळात शरद पवार गटात 'नाराजीनाट्य'; सुनील माने वेगळी भूमिका घेणार...?

Satara Loksabha : सातारा लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीकडून जोर लावला आहे. त्यांचा उमेदवार अजूनही जाहीर नसला, तरी उदयनराजे यांनी जिल्हा पिंजून काढायला सुरुवात केली आहे.
Sharad Pawar  Sunil Mane
Sharad Pawar Sunil Mane sarkarnama
Published on
Updated on

- हेमंत पवार

Satara Loksabha News : सातारा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. श्रीनिवास पाटील यांचे नाव या मतदारसंघातून चर्चेत असताना तब्बेतीच्या कारणाने माघार घेतली. त्यानंतर काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सारंग पाटील, सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नावांची चर्चा होती. माने यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात होती. मात्र, शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. शशिकांत शिंदे नुकतेच सातार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. मात्र या दौऱ्यात जिल्हाध्यक्ष माने कुठेच दिसले नाही. त्यामुळे शरद पवार गटात 'नाराजीनाट्य' रंगल्याच्या चर्चा आहेत.

Sharad Pawar  Sunil Mane
Madha Lok Sabha 2024 : माढ्यात भाजपला पुन्हा धक्का; मोहिते पाटील-जानकर येणार एकत्र!

सातारा लोकसभेची (Satara Loksabha) निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीकडून जोर लावला आहे. त्यांचा उमेदवार अजूनही जाहीर नसला, तरी उदयनराजे यांनी जिल्हा पिंजून काढायला सुरुवात केली आहे. महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (shashikant shinde) निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या कसेाटीच्या काळात उमेदवारीवरून नाराज झालेल्या सुनील मानेंची नाराजी दूर करण्याचे पक्षासमोर आव्हान असेल.

कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर पालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदा सुनील माने हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. अत्यंत कमी वयात ते निवडून आल्यानंतर त्यांचा राजकीय उदय झाला. ते त्यावेळी डॉ. शालिनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. राष्ट्रवादीच्या माध्यमातून १९९९ पासून त्यांनी रहिमतपूर पालिकेत एकहाती सत्ता कायम राखली आहे. त्यांनी काही शैक्षणिक संस्थाही सुरू केल्या आहेत. त्याद्वारे त्यांचा संपर्क आहे.आमदार बाळासाहेब पाटील यांच्या सहकार्यातून माने यांनी सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. राष्ट्रवादी एकत्रित असताना झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, ऐनवेळी त्यांच्याऐवजी प्रभाकर घार्गेंचे नाव पुढे आले. त्यामुळे आमदारकीने त्यांना हुलकावणी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदारकीने हुलकावणी दिल्याने माने लोकसभा निवडणूक लढतील, अशी शक्यता होती. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नाव थेट जाहीर न करता शरद पवार यांनी लोकसभेची उमेदवारी कोणाला द्यायची? याच्या चर्चेसाठी मुंबईत बैठक घेतली. त्यात सुनील मानेंच्या नावाची चर्चा झाली. लोकप्रतिनिधींनीही त्यांचे नाव लोकसभेचा उमेदवार म्हणून पुढे केले होते. मात्र, आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शशिकांत शिंदे यांचा दोन दिवसापूर्वीच सातारा जिल्ह्यात दौरा केला. त्यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची अनुपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

Sharad Pawar  Sunil Mane
Girish Mahajan @ Latur : पालकमंत्री असूनही गिरीश महाजन गुपचूप लातुरात; काय आहे कारण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com