Uttam Jankar, Umesh Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Loksabha News : उत्तम जानकरांच्या डोक्यावर परिणाम; अजितदादांवरील टीकेनंतर राष्ट्रवादीचा पलटवार

Sharad Pawar महायुतीची साथ सोडून शरद पवार आणि मोहिते पाटलांसोबत गेल्यानंतर उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती.

Umesh Bambare-Patil

Madha Loksabha News : महायुतीची साथ सोडून शरद पवार आणि मोहिते पाटलांसोबत गेल्यानंतर उत्तम जानकरांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उत्तम जानकर यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यानेच ते अजितदादांची पक्षातून हकालपट्टी करतो, असे वक्तव्य करत असल्याचे उमेश पाटील यांनी म्हटले आहे.

महायुतीची साथ सोडून शरद पवार आणि मोहिते पाटलांसोबत गेल्यानंतर उत्तम जानकरांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली होती. अजित पवार हे मला पक्षातून काढून टाकणार काय असा सवाल त्यांनी विचारला होता. मी पक्षाचा संस्थापक सदस्य असल्याने मीच अजित पवारांना पक्षातून काढून टाकतो, असं उत्तम जानकर म्हणाले होतं. त्याला राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

उमेश पाटील म्हणाले, उत्तम जानकर यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यानेच ते अजितदादांची पक्षातून हकालपट्टी करतो असे वक्तव्य करत आहे. ज्यांनी लाट्या काट्या खाल्ल्या त्या कार्यकर्त्यांना सोडून आमदारकीसाठी उत्तम जानकर हे मोहिते पाटलांकडे लोळण घ्यायला गेले आहेत. मुळात अजितदादांवर बोलावं एवढी जानकारांची पात्रताही नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

धनगर समाजावर मोहिते पाटलांनी पिढ्यान् पिढ्या अन्याय केला आहे. त्याचा उठाव म्हणून तेथील जनता जानकरांच्या पाठीशी होती. त्या जनतेला वाऱ्यावर सोडून जानकर हे आता मोहिते पाटलांकडे गेले. त्यामुळे तेथील जनता जानकारांच्या पाठीशी जाणार नाही. फक्त आमदारकीचा शब्द मिळाल्यामुळे उत्तम जानकर मोहिते पाटलांकडे गेल्याने ते किती लबाड आणि फसवे आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT