Solapur, Madha Lok Sabha : सोलापुरात 11, तर माढ्यातून सहा उमेदवारांची माघार; ‘वंचित’ची माघार धक्कादायक!

Lok Sabha Election 2024 : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांच्यासह एकूण अकरा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. माढा लोकसभा मतदारसंघातूनही सहा जणांनी माघार घेतली आहे, त्यामुळे माढ्यात आता ३२ उमेदवार निवडणुकीला उभे असणार आहेत.
NCP-Congress-BJP
NCP-Congress-BJPSarkarnama

Solapur, 22 April : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांच्यासह एकूण अकरा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात आता काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, भाजपचे राम सातपुते यांच्यासह 21 उमेदवार रिंगणात आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातूनही सहा जणांनी माघार घेतली आहे, त्यामुळे माढ्यात आता 32 उमेदवार निवडणुकीला उभे असणार आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील (Solapur Lok Sabha constituency) 32 उमेदवारी अर्ज छाननीत वैध ठरले हेाते. त्यातील अकरा उमेदवारांनी आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतली आहे, त्यामुळे सोलापूर लोकसभेच्या रणांगणात 21 उमेदवार निवडणुकीत मैदानात असणार आहेत. त्यात प्रामुख्याने आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात मुख्य लढत होणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

NCP-Congress-BJP
NCP's Manifesto : राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा

वंचित बहुन आघाडीचे राहुल गायकवाड, यांच्यासह रविकांत बनसोडे, दगडू घोडके, दत्तात्रेय थोरात, प्रमोद गायकवाड, श्रीदेवी फुलारे, राहुल बनसोडे, भारत कुंदकुरे, मनोहर कोरे, रवी म्हेत्रे आणि राजशेखर कंदलगावकर या अकरा उमेदवारांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आपले अर्ज मागे घेतले आहेत. आता उर्वरीत उमेदवारांमधील काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यांच्यात थेट लढत होणार आहे, हे निश्चित आहे.

माढा लोकसभेसाठी 42 उमेदवारांनी 55 अर्ज दाखल केले होते. छाननीत 38 उमेदवारांचे 47 अर्ज वैध ठरले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सहा उमेदवारांनी माघार घेतल्याने माढ्यात आता 32 उमेदवारांचे अर्ज असणार आहेत. शेकापचे सचिन देशमुख, शहाजान शेख, गणेश चौगुले, नागेश हुलगे, मनोज अनपट, रामचंद्र गायकवाड यांचा माघार घेणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

NCP-Congress-BJP
Solapur 'Vanchit' News : माझ्या हातात बंदूक दिली, पण गोळ्या दिल्या नाहीत; सोलापूरमधील ‘वंचित’च्या उमेदवाराचा गंभीर आरोप

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर, बहुन समाज पक्षाचे स्वरूप जानकर, लक्ष्मण हाके हे प्रमुख उमेदवारांसह 32 उमेदवारांचे अर्ज असणार आहेत. यात राष्ट्रवादीचे मोहिते पाटील आणि भाजपचे नाईक निंबाळकर यांच्यात तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे.

NCP-Congress-BJP
Madha Loksabha : माढ्यातून शेकापच्या देशमुखांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com