Mahadevrao Mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahadev Mahadik News : आप्पांचं खिडकीतूनच 'मॅनेजमेंट'; 'महाडिक गट अजून मजबूत, काळजी करू नका!'

Sunil Balasaheb Dhumal

राहुल गडकर

Kolhapur Political News : छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महागणपतीची आरती असो वा, राजाराम कारखान्याची सभा. पुतण्याच्या विजयाची मिरवणूक असो वा, कारखान्याची विजयी मिरवणूक. जोपर्यंत आप्पांची (महादेवराव महाडिक) यांची शिट्टी वाजत नाही, तोपर्यंत त्याला रंग चढत नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.

'आप्पांची झलक सबसे अलग,' अशीच ओळख आतापर्यंत राहिली आहे. मात्र, यंदाच्या राजाराम कारखान्याच्या वार्षिक सभेत आप्पांची शिट्टी वाजली नाही. यामुळे आता वेगळीच चर्चा रंगतेय, ती म्हणजे आप्पांच्या मॅनेजमेंटची. खिडकीत बसून बारीक लक्ष ठेवून आप्पा सर्व सभेची विचारपूस करत होते. (Latest Political News)

राजाराम सहकारी साखर कारखान्याची यंदाची वार्षिक सभा 'मल्टिडिस्ट्रिक्ट'वरून गाजण्याची चिन्हे होती. विरोधक पाटील गट विरुद्ध सत्ताधारी महाडिक गट आमनेसामने येण्याची शक्यता होती. तसेच वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. पण या सर्व घडामोडींमागे माजी आमदार महादेव महाडिक हे बारीक लक्ष ठेऊन होते. पुत्र माजी आमदार व चेअरमन अमल महाडिक हे वार्षिक सभेला येणाऱ्या सभासदांचे स्वागत करत होते.

महादेवराव महाडिक मात्र गेटमधून येणाऱ्या प्रत्येक सभासदांचे बारीक निरीक्षण करत होते. त्यांच्या ऑफिसमागील खिडकी उघडी ठेऊन येणाऱ्यांवर लक्ष ठेवून होते. जवळ येणाऱ्यांना आप्पा त्यांच्या शैलीत उत्तर देत होते. 'सगळा बंदोबस्त झालेला आहे. महाडिक गट अजून मजबूत हाय. काय होणार नाही! जे व्हायचं ते होणार आहे, साहेब! काळजी करू नका,' असे जवळ येणाऱ्यांना खिडकीतूनच बोलून धीर देत होते.

विषयाच्या आधीच मंजूरच्या घोषणा

राजारामच्या वार्षिक सभेत सभासद रिकाम्या हाताने आले होते. मात्र, सभास्थळी मंजूरचे फलक ठेवण्यात आले होते. सभेतील ठराव वाचण्याआधीच सभासद आणि कार्यकर्त्यांच्या हातात मंजूरचे फलक नाचत होते. हे फलक कुठून आले, असा सवालही सभेस्थळी होता.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT