Delhi Political News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना १६ आमदार अपात्रतेबाबत सुनावणीसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकाबाबत नार्वेकरांवर आरोप करत आणि वेळापत्रकावर आक्षेप घेत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. ठाकरे गटाने केलेल्या आरोपांनी राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण चांगलेच तापले आहे. (Latest Political News)
दरम्यान, या प्रकरणी अध्यक्ष दिरंगाई करत असल्याचा आरोप करून ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली होती. यावर कानउघाडणी करत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दोन आठवड्यांत सुनावणीचा रोडमॅप सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अध्यक्षांनी आमदारांची सुनावणी घेत पुढील सुनावणीचे वेळापत्रकही तयार केले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्रतेबाबत १३ ते २३ ऑक्टोबरदरम्यान सुनावणी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या वेळापत्रकावरच ठाकरे गटाकडून आक्षेप घेतला आहे. (Maharashtra Political News)
ठाकरे गटाने न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात विधानसभा अध्यक्ष नार्वेकर (Rahul Narwekar) या प्रकरणी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सुनावणीचा मुख्य विषय असलेली १६ आमदार अपात्रतेच्या याचिकेशिवाय इतर विषयांवर जास्त वेळ घालवला जात असल्याकडेही लक्ष वेधले आहे. हे मुद्दे उपस्थित करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून सुनावणी होऊन लवकर निकाल लागवा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यावेळीही ठाकरे गटाने उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रतेच्या वेळापत्रकाबाबत होणाऱ्या सुनावणीकडे देशाचे लक्ष आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.