Kolhapur municipal elections result; shivsena UBT Sunil Modi  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena UBT Crisis : ठाकरेंच्या शिवसेनेत निकालाचा भूकंप! शहराध्यक्षांचा थेट राजीनामा

Sunil Modi resigns after KMC elections result : कोल्हापूर महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठं यश मिळाले असून ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र अपेक्षित यश मिळाले नाही.

Rahul Gadkar

  • कोल्हापूर महापालिका निवडणुकीत ठाकरे सेनेला पाच पैकी केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला.

  • काँग्रेससोबतच्या जागावाटपामुळे ठाकरे सेनेची मोठी नाचक्की झाल्याचे चित्र आहे.

  • पराभवानंतर शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र देत पक्षाचा राजीनामा दिला.

Kolhapur municipal elections result News : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ठाकरे सेनेचा दारुण पराभव झाला. मुळात काँग्रेस आणि ठाकरे सेना एकत्र लढत असताना जागा वाटपामध्येच कमी जागा मिळाल्याने नाचक्की झाली. सुरुवातीला दोन अंकी जागा ठाकरेच्या सेनेला देण्यात येतील अशी ग्वाही काँग्रेसच्या नेत्यांकडून देण्यात आल्यानंतर ही अखेरच्या क्षणी केवळ पाच जागांवरच ठाकरे सेनेला समाधान मानावे लागले.

प्रभाग क्रमांक पाच मधून निवडणुकीला इच्छुक असणारे ठाकरे सेनेचे शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी देखील शेवटच्या क्षणी माघार घेतली. अखेर आज निकाल जाहीर झाल्यानंतर पाच पैकी केवळ एकाच जागेवर ठाकरेंच्या सेनेला विजय मिळवता आला. त्यामुळे पराभव झाल्यानंतर ठाकरेंच्या शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी थेट पक्षाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्रक देऊन त्यांनी आपला राजीनामा दिला आहे.

दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोल्हापूर महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे संपूर्ण राजकीय व नैतिक जबाबदारी स्वीकारून, मी कोल्हापूर शहर प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे.

या निवडणूक प्रक्रियेमध्ये स्थानिक पातळीवरील अंतर्गत गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि संघटनात्मक दुर्लक्ष याचा थेट फटका पक्षाला बसला. वारंवार वरिष्ठांना याची कल्पना देऊनही संघटनात्मक ताकद एकत्र उभी राहू शकली नाही. तरीही पक्षाची प्रतिमा, युतीची जबाबदारी आणि शिवसेनेची परंपरा जपण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे केला.

विशेषतः काँग्रेसचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी युतीधर्म पाळत आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न केले, ते उल्लेखनीय असून त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. पदावर राहून स्पष्टीकरण देण्यापेक्षा, राजकीय जबाबदारी स्वीकारून निर्णय घेणे हे शिवसेनेच्या संस्कृतीला साजेसे आहे, या भावनेतूनच हा राजीनामा देत आहे.

मात्र याचा अर्थ पक्षाशी निष्ठा कमी होणे असा नसून, यापुढेही मी मातोश्रीशी एकनिष्ठ राहून, कोणतेही पद न स्वीकारता, एक सामान्य शिवसैनिक म्हणून पक्षासाठी काम करत राहीन. माझा राजीनामा स्वीकारण्यात यावा, ही नम्र विनंती.

FAQs :

1. कोल्हापूर महापालिकेत ठाकरे सेनेला किती जागा मिळाल्या?
ठाकरे सेनेला पाच पैकी केवळ एकाच जागेवर विजय मिळाला.

2. ठाकरे सेनेच्या पराभवाचे मुख्य कारण काय?
काँग्रेससोबतच्या जागावाटपात कमी जागा मिळाल्याने पक्षाला फटका बसला.

3. सुनील मोदी कोण आहेत?
सुनील मोदी हे ठाकरे सेनेचे कोल्हापूर शहराध्यक्ष होते.

4. सुनील मोदी यांनी राजीनामा का दिला?
निवडणुकीतील दारुण पराभवानंतर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला.

5. या पराभवाचा ठाकरे सेनेवर काय परिणाम होऊ शकतो?
स्थानिक पातळीवर पक्षाची संघटनात्मक ताकद कमकुवत होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT