Shivsena UBT Politics: वसंत गिते यांचे अस्तित्व पणाला, भाजपसह स्वपक्षीयांनीही घेरल्याने महापालिकेसाठी एकहाती लढत!

Nashik Shivsena Uddhav Thackerey NMC election Vasant Gite single hand fight BJP & Eknath shinde-भाजपसह स्वपक्षीयांनीच्या पक्षांतरानंतर एकहाती महापालिका निवडणुकीत लढवला शिवसेना, मनसेचा नाशिकचा किल्ला
Vasant Gite
Vasant GiteSarkarnama
Published on
Updated on

NMC election News: नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या गेले तीन आठवडे धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी थंड झाल्या. शहरात भाजप, शिवसेना शिंदे-राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना-मनसे असा थेट सामना झाला. यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्वाधिक उमेदवार उद्धव ठाकरे यांनी उतरवले होते.

आरोप-प्रत्यरोपांनी यंदा नाशिक महापालिकेची निवडणूक सर्वाधिक गाजली आहे. सत्ताधारी पक्षाविरोधात अनेक मुद्दे असतानाच शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेससह विरोधकांचे अनेक प्रबळ उमेदवार, नेते अगदी उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत हात बांधून भाजपमध्ये दाखल होताना दिसले.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘हंड्रेड प्लस’ हे उद्दीष्ट जाहिर केले होते. ते साध्य करण्यासाठी त्यांनी गेले वर्षभर नेटाने व्युहरचना आखली होती. त्यात थेट विरोधकांचे प्रबळ मोहरेच गळाला लावले. त्यामुळे विरोधक नामोहरम करण्यात ते यशस्वी झाले.

Vasant Gite
Sispe scam : सिस्पे घोटाळ्यावर मंत्री विखेंचा घणाघात; ‘जुना-नवा लंके काय आहे ते..!’

शहरातील एकतीस प्रभागांतून १२२ नगरसेवकांची निवड मतदार उद्या (ता. १५) मतदानाद्वारे करणार आहेत. मात्र तीन आठवडे रंगलेल्या प्रचारात स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे-अजित पवार यांच्या युतीला आक्रमक उत्तर देण्याची जबाबदारी शिवसेना ठाकरे पक्षाने एकट्याने पार पाडली.

Vasant Gite
Sunil Tatkare Politics: ‘त्या’ महिला उमेदवार थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनाच भिडल्या; या कारणाने रंगला निवडणुकीतच राष्ट्रवादीत वाद?

प्रबळ साधन सामग्री अन् ताकदवान उमेदवार भाजपने उतरवले होते. प्रदेश सचिव दिनकर पाटील यांच्यावर मनसेची सर्व भिस्त होती. मात्र दिनकर पाटील ऐनवेळी भाजपवासी झाले. माजी महापौर विनायक पांडे आणि प्रदिर्घ काळ काँग्रेसमध्ये राहून पदे उपभोगलेले शाहू खैरे यांनी शेवटच्या क्षणी भाजपचा झेंडा हाती घेतला.

या स्थितीत दलबदलू नेते व सत्ताधारी आघाडीत उमेदवारी घेतलेल्यांना माजी आमदार वसंत गिते यांनी शिंगावर घेतले. त्यांनी एकाकी निवडणूक प्रचारात लढत देत वातावरण निर्मिती केली. उद्धव आणि राज ठाकरे यांची पहुली संयुक्त सभा नाशिकला झाली. ती यशस्वी झाली.

विधानसभा निवडणुकीनंतर नगरपालिका निवडणुकीचा निकालात महायुतीच्या सर्वच पक्षांनी बाजी मारली. त्यामुळे शिवसेना ठाकरे, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष एकाकी होते. धक्कादायक म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाचे नेते अक्षरशः गायब होते.

माजी आमदार वसंत गिते, खासदार राजाभाऊ वाजे या दोघांनी प्रचारात आघाडी घेत शहर पिंजून काढले. प्रबळ भाजपचे गणित बिघडवण्यासाठी त्यांनी प्रचारात रंग भरला. नाशिक महानगरपालिका घेण्यासाठी महायुतीने आपले सर्वस्व पणाला लावले होते. त्यात विरोधकांचा किल्ला माजी आमदार गिते यांनी एकाकी लढवला.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com