Krushi Mitra Jojana; Agriculture Minister Dattatray Bharne sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Krushi Mitra Jojana : कृषी मंत्र्यांचा धडाकेबाज निर्णय! गावागावात शेतकरी मित्र, तरुण शेतकऱ्यांना १८ हजार मानधन

Agriculture Minister Dattatray Bharne On Krushi Mitra Yojana : राज्याच्या कृषी विभागाने राज्यातील प्रत्येक गावात एक शेतकरी मित्र नेमण्याची घोषणा केल्याची माहिती कृषि मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली आहे.

Aslam Shanedivan

  1. राज्यातील प्रत्येक गावात कृषी मित्र नेमण्याचा निर्णय.

  2. या योजनेतून तरुणांना रोजगाराची संधी मिळणार.

  3. निवडलेल्या कृषी मित्रांना 18000 रुपये मानधन दिले जाणार.

Pune News : राज्याच्या कृषी विभागाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना आणली असून त्यानुसार प्रत्येक गावामध्ये आता कृषी मित्र नेमण्यात येणार आहे. या माध्यमातून तरुण शेतकऱ्यांना एक उत्तम संधी मिळणार असून यासाठी सरकारकडून उत्तम अस मानधनही देण्यात येणार असल्याचं कृषि मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले आहे.

पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दत्तात्रय भरणे यांनी याबाबत माहिती दिली. भरणे म्हणाले, राज्यामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन व्हावं तसेच सरकारी योजना आणि शेती विषयक सल्ले योग्य वेळेत मिळावे. यासाठी राज्यामध्ये कृषी पर्यवेक्षक म्हणून 11,587 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच आता आत्मा योजनेअंतर्गत शेतकरी मित्रांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

प्रत्येक गावामध्ये एक शेतकरी मित्र नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबाबतच्या अटी शर्ती सरकारकडून निश्चित करण्यात येत असून अनुभवी प्रयोगशील आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणारा शेतकऱ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात यावी असा आमचा मानस असल्याचे भरणे यांनी सांगितले.

भरणे पुढे म्हणाले, प्रत्येक सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांसोबत हा शेतकरी मित्र काम करेल असा संकल्प करण्यात आला आहे. या कृषी मित्र अथवा शेतकरी मित्रासाठी मानधन निश्चित करण्यात आला असून वर्षाला 18000 मानधन देण्यात येणार आहे. हे मानधन प्रती तीन महिन्याला मिळणार आहे. ही योजना एक जून पासून कार्यान्वितचा सरकारचा विचार आहे.

या शेतकरी मित्रासाठी आपण 30 टक्के महिलांना प्राधान्य देणार असून या शेतकरी मित्राचा वय ते 40 पेक्षा जास्त असू नये. त्याचे संवाद कौशल्य चांगल असावा समाजकार्याची ओढ असावी तसेच सोशल मीडिया चा वापर त्याला येणे आवश्यक असून माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण त्याने पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. अशा शेतकरी व्यक्तीला आपण शेतकरी मित्र म्हणून नियुक्त करणार आहोत असं दत्तात्रय भरणे म्हणाले. पहिल्या टप्प्यामध्ये 11,587 कृषी मित्र नियुक्त करण्यात येणार असून त्यांची नियुक्तीची प्रक्रिया ही जिल्हास्तरावर होणार असल्याचं भरणे यांनी स्पष्ट केलं.

FAQs :

1. कृषी मित्र योजना काय आहे
प्रत्येक गावात कृषी सहाय्यक नेमण्याची सरकारी योजना आहे

2. या योजनेत किती मानधन मिळणार आहे
प्रत्येक कृषी मित्राला 18000 रुपये मानधन मिळणार आहे

3. या योजनेचा फायदा कोणाला होणार
शेतकरी आणि ग्रामीण भागातील युवकांना फायदा होणार

4. कृषी मित्र काय काम करणार
शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन आणि मदत करणार

5. ही योजना कोणत्या विभागाने जाहीर केली
राज्याच्या कृषी विभागाने ही योजना जाहीर केली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT