Rajesh Kshirsagar, Dhananjay Mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhananjay Mahadik : तुमची 15 हजार मतं असतील तर आमची 80 हजार! महाडिकांनी क्षीरसागरांना दाखवला आरसा

Rahul Gadkar

Kolhapur Politics : कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर वरून महायुतीत सुरू असलेल्या चढाओढीनंतर आता अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि भाजपचे नेते राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यात कोल्हापूर उत्तरच्या जागेवरून चढाओढ निर्माण झाली आहे. क्षीरसागर यांनी दक्षिणमध्ये मेळावा घेतल्यानंतर त्यावर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी प्रतिक्रिया देत क्षीरसागर यांनाच इशाला दिला आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर भाजपने पहिल्यापासूनच दावा केला आहे. पोटनिवडणुकीत आम्ही ही जागा लढवली आणि 80 हजार मतदान घेतले. राजेश क्षीरसागर यांनी घेतलेला मेळावा कोणावर दबाव टाकण्यासाठी असू नये. ते जर दक्षिणमध्ये आमची 15 हजार मतं आहेत, असं म्हणत असतील तर आमची उत्तर मध्ये 80 हजार मतं आहेत, असा इशारा महाडिक यांनी दिला आहे.

एकमेकांना सोबत घेऊन गेलो तरच आपण जागा निवडून आणू शकतो. निवडणुकीच्या तोंडावर गैरसमज होणारे मेळावे होऊ नयेत, असा सल्लाही महाडिक यांनी क्षीरसागर यांनी दिला. पश्चिम महाराष्ट्रात एकूण 58 पैकी महायुतीकडे 41 जागा आहेत. यावेळी 48 ते 49 जागा निवडून येतील, या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असल्याचे महाडिकांनी सांगितले.

कोल्हापूरमधील दहा पैकी चार जागा भाजपने लढवाव्यात, अशी विनंती आम्ही केली. शिवाय महायुती म्हणून जास्तीत जास्त जागा निवडून येतील, असे आमचे प्रयत्न आहेत, असे महाडिकांनी स्पष्ट केले. जागा वाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. भारतीय जनता पार्टीने आपल्या पदाधिकाऱ्यांना बोलवून आढावा घेतला असल्याचं महाडिक यांनी सांगितलं. अजित पवार महायुती मधून बाहेर पडण्याचा प्रश्नच येत नाही. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता येत असताना अजितदादांचा मोठा वाटा असेल असा विश्वासही महाडिकांनी व्यक्त केला.

हरियाणा मध्ये काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर जातीचे राजकारण आणि तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीनंतर देशातील लोक सजग झाले आहेत. खोटा नेरेटिव्ह सेट केला गेला, हे आता कळले. त्याचाच परिणाम म्हणून हरियाणा आपल्याला बघता येईल. हरियाणासारखं किंवा त्यापेक्षाही मोठे यश महाराष्ट्रात महायुतीला मिळेल, असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT