Sharad Pawar: शरद पवारांचा एकच प्रश्न; इच्छुकांची फिरकी; मुलाखतीत काय विचारलं?

kolhapur News Vidhansabha what happened in sharad pawar meeting: कोल्हापुरातील दहा विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची शरद पवार यांनी पुणे येथे मुलाखती घेतल्या. पक्षसंघटन, निवडून येण्याबाबतचे नियोजन आदींबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: आगामी विधानसभा निवडणुकीची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्षात प्रत्येक मतदारसंघातून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे.

पुण्यात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केवळ एकच प्रश्न विचारत इच्छुक उमेदवारांची फिरकी घेतली.

तुम्ही निवडून कसे येणार? याचं स्पष्टीकरण पवार यांनी विचारत उमेदवारांना बोलते केले.शाहूवाडी करवीर आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक कोणीच नसल्याचे दिसून आले.

कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील जे उमेदवार विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि तुतारी फुंकण्यावर ठाम आहेत अशा उमेदवारांची शरद पवार यांनी पुणे येथे मुलाखती घेतल्या.

Sharad Pawar
Haryana Assembly Result 2024: टायमिंग चुकले! भाजपची साथ सोडलेल्या तीन नेत्यांचे राजकीय भवितव्य अंधारात?

कोल्हापुरातून जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यासह दहा जणांनी मुलाखती दिल्या. यावेळी पक्षाकडून संसदीय समितीचे सदस्य खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते-पाटील, फौजिया खान, माजी खासदार वंदना चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे यांनी प्रक्रिया राबविली.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी इच्छुक उमेदवारांना केवळ एकाच प्रश्नावर फिरकी घेत आपण निवडून कसे येणार? याचे रणनीती स्पष्ट करावी, असे विचारले. कोल्हापूर उत्तर मधून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हि बी पाटील, राधानगरी मधून ए वाय पाटील, संतोष मेघाने, चंदगड विधानसभा मतदारसंघातून अमरसिंह चव्हाण नंदाताई बाभुळकर, ‘कागल’मधून समरजितसिंह घाटगे, ‘इचलकरंजी’मधून माजी आमदार अशोकराव जांभळे, मदन कारंडे आणि ‘शिरोळ’मधून स्नेहा देसाई यांनी मुलाखती दिल्या.

यावेळी पवार यांनी मतदारसंघातील पक्षसंघटन, निवडून येण्याबाबतचे नियोजन आणि मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन आदींबाबतची माहिती उमेदवारांकडून जाणून घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com