Pune News : छत्रपती संभाजी राजे यांच्या इतिहासावर आधारित छावा चित्रपट सध्या सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. इतिहासाची प्रतारणा न करता शंभूराजांच्या जीवनावर बनवलेल्या या चित्रपटाला टॅक्स फ्री करण्यात यावा, अशी मागणी सर्व स्तरात होत आहे. मात्र हा चित्रपट टॅक्स फ्री करता येणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे आणि त्याचं कारण देखील त्यांनी सांगितलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात हजेरी लावली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, मी महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत आहे. छत्रपती होते म्हणून आम्ही आहोत. महाराजांनी आम्हाला आत्मअभिमान आणि आत्मतेज दिलं. तसेच समतेचा संदेश दिला. 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली. त्यांनी त्याच स्वराज्याच्या निर्मिती मधून एकतेचा संदेश दिला.
राजकारभार कसा चालला पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं. जलसंवर्धन, कर प्रणाली, जल संरक्षण कसं करावं याबाबत देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवण दिली आहे. मराठी भाषेला पहिल्यांदा राज भाषेचा दर्जा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.
दरम्यान छावा (Chhaava) चित्रपट टॅक्स फ्री करावा, अशी मागणी सर्वत्र करण्यात येत आहे. याबाबत राज्य शासन काही निर्णय घेणार आहे का? असा प्रश्न त्यांना विचारला असता फडणवीस म्हणाले, मला आनंद आहे की, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित अतिशय चांगला आणि इतिहासाची कोणतीही प्रतारणा न करता हा चित्रपट बनवला आहे. त्यांची विरता, शौर्य आणि विद्वत्ता प्रचंड होती. मात्र इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केला. फण आता अतिशय चांगला आणि ऐतिहासिक असा हा चित्रपट बनला आहे. त्यासाठी मी पहिल्यांदा निर्माते, दिग्दर्शक आणि या पिक्चर मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्यांचे अभिनंदन करतो.
हा सिनेमा टॅक्स फ्री करावा अशी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. परंतु महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगू इच्छितो की इतर राज्य जेव्हा एखादा चित्रपट टॅक्स फ्री करतात तेव्हा ती राज्य जो करमणूक कर आहे तो माफ करत असतात. मात्र महाराष्ट्र सरकारने 2017 मध्ये निर्णय घेतला असून करमणूक कर हा कायमचा रद्द केला आहे. त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर माफी देण्यासाठी तो करच नाही आहे. मात्र या चित्रपटाला अधिकाधिक प्रसिद्धी मिळून देण्यासाठी काय मदत करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.