
Mumbai News, 11 Jan : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण (Malvan) येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात कोसळला. पुतळा उभारल्यानंतर अवघ्या आठ महिन्यातच तो कोसळल्याच्या घटनेमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या होत्या. तर या घटनेवरून राज्यातील राजकारण देखील चांगलंच तापलं होतं.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम करण्यातही भ्रष्टाचार केल्याचा आरोप, राज्य सरकावर होणारी टीका आणि शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेता पोलिसांनी वेगाने तपास करत या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली होती. यातील चेतन पाटील या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) याआधीच जामीन मंजूर केला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळेलेल्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेलाही आता उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
पुतळा कोसळल्याच्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आता आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नसल्याचं सांगत हायकोर्टाने हा जामीन मंजूर केला आहे. शिवाय या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही, त्यामुळे हत्येचा प्रयत्न केल्याचं कलम इथं लागू होत नसल्याचं निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती नितीन बोरकर यांनी हा जामीन मंजूर केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण 4 डिसेंबर 2023 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते करण्यात आलं होतं. मात्र, हा पुतळा अवघ्या आठ महिन्यात म्हणजे 26 ऑगस्ट 2024 रोजी कोसळला. या पुतळ्याच्या बांधकामासाठी 2 कोटी 44 लाख खर्च केल्याची माहिती सामाजिक बांधकाम विभागाने दिली होती.
तसंच या पुतळ्याचे काम नौदलामार्फत झाल्याचं राज्य सरकारने सांगितलं होतं. या घटनेवरून राज्यातील राजकारण तापलं होतं. विरोधकांनी या पुतळ्यात सरकारने भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत सरकारला घेरलं होतं. या प्रकरणात सरकारची मोठी बदनामी झाली होती. त्यानंतर अखेर या पुतळ्याचा शिल्पकार शिल्पकार जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली होती, याच आपटेला आता जामीन मंजूर करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.