Mahayuti Leaders Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Govt Formation: मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? सांगली-कोल्हापुरात कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता

Maharashtra Govt Formation Live Updates : महायुतीच्या सरकारमध्ये खाडे हे मंत्री होते. मात्र गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत. त्यामुळे मंत्रिपदाची माळ सांगलीत कोणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता लागली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: विधानसभा निवडणूक झाल्यानंतर रखडलेला शपथविधी आणि मंत्रिमंडळ निवड उद्या निश्चित होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे शपथ घेणार आहेत.

अशातच कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्ह्यात कोणाची वर्णी लागणार याबाबत ही उत्सुकता लागली आहे. मात्र भाजपकडून नेहमीच वापरल्या जाणाऱ्या धक्कातंत्राची चर्चा असते. जुन्या जाणत्या ज्येष्ठांना डावलत नेहमीच भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा टि्स्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्याने भाजपला यंदा चंदगडच्या अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांच्यासह तीन आमदार दिले आहेत. सांगली जिल्ह्याने देखील भाजपला तीन आमदार दिलेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अमल महाडिक हे दुसऱ्यांदा आमदार झालेत. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राहुल आवाडे हे पहिल्यांदा आमदार झाले.

चंदगडच्या शिवाजी पाटलांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यात मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणाऱ्या याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र भाजपच्या घटक पक्ष असलेला जनसुराज्य शक्तीचेही दोन आमदार आहेत. शिवाय अनुभव आणि ज्येष्ठ आमदार विनय कोरे त्यांच्याकडे असल्याने भाजपच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपदाची शक्यता वर्तवली जात आहे.

सांगली जिल्ह्यातून शिराळा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सत्यजित देशमुख, मिरज मधून माजी मंत्री सुरेश खाडे, तर जत मधून गोपीचंद पडळकर विजय झाले आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये खाडे हे मंत्री होते. मात्र गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत. त्यामुळे मंत्रिपदाची माळ सांगलीत कोणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता लागली आहे.

एकंदरीतच पाहता भाजपकडून धक्कातंत्र देण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. ज्येष्ठ आणि जुन्या चेहऱ्यांना बाजूला ठेवत भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देत आहे. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे सांगलीच्या मैदानातून मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकते. याची दाट शक्यता आहे. गोपीचंद पडळकर यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते. तर कोल्हापूर जिल्ह्यात पाहता आमदार विनय कोरे यांच्यासह आमदार अमल महाडिक यांच्या गळ्यात देखील मंत्रिपदाची माळ पडू शकते.

भाजपला एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी यश आले आहे. उद्या राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याकडे राज्यातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT