Punjab News: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. या गोळीबारात बादल थोडक्यात बचावले आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या भोवती जमल्याने बादल बचावले.
शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल अमृतसर येथील स्वर्ण मंदिराच्या बाहेर दरबान (सुरक्षारक्षक) म्हणून शिक्षा भोगत आहेत. येथे शिक्षा भोगण्यासाठी बादल सकाळीच पोहोचले होते ते क्लॉक टॉवरच्या बाहेर भाला धरून बसले होते, त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
हल्लेखोराने पिस्तूल रोखताच बादल यांच्या भोवती तेथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेरलं, काहींनी हल्लेखोराला पकडले. मात्र, हल्लेखोराने तरीही गोळ्या झाडल्या. सुदैवाने सुखबीरसिंग बादल हे सुखरुप बचावले आहेत.
सुखबीर सिंह बादल यांना शिख समुदायाचे सर्वोच्च न्यायालय म्हणून ओळखले जाणारे श्री अकाल तख्त साहिबने त्यांना धार्मिक शिक्षा सुनावली आहे. सुखबीर यांच्यासह 17 जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. यात 2015 मधील अकाली सरकारच्या काही कॅबिनेट मंत्र्यांचाही समावेश आहे.
काल (मंगळवारी) त्यांच्या शिक्षेचा पहिला दिवस होता. आज बादल 'सेवा' करत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्याचवेळी शिरोमणी अकाली दलाने पंजाब पोलिसांवर पुरेशी सुरक्षा पुरवली नसल्याचा गंभीर आरोप केला आहे.
'येथे कडक सुरक्षा व्यवस्था होती. सुखबीर यांना योग्य सुरक्षा कवच देण्यात आले. हल्लेखोर नारायण सिंह चौरा कालही येथे होता. आजही त्यांनी प्रथम गुरूंना नमन केले. मात्र या गोळीबारात कुणाही जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे,' असे शिरोमणी अकाली दलाच्या आरोपांवर एडीसीपी हरपाल सिंह यांनी दावा केला आहे.
गुरू ग्रंथ साहिबच्या अपमानाच्या प्रकरणात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमची बाजू घेतल्याबद्दल सुखबीर सिंह बादल यांना शिक्षा सुनावली आहे.
सुखबीर सिंह बादल यांचे वडील आणि पंजाबचे दिवंगत माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्याकडून फखर-ए-कौम सन्मान काढून घेण्यात आला आहे.
सुखबीर यांच्यासह 17 जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. यात 2015 मधील अकाली सरकारच्या काही कॅबिनेट मंत्र्यांचाही समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.