Shashikant Shinde addressing supporters during the Kurduwadi municipal election campaign. His statement on the emerging alliance has intensified the Maharashtra politics debate. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिवसेनेची युती...'; भाजप-शिंदेसेनेत धुसफूस सुरू असतानाच शशिकांत शिंदेंनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

Shashikant Shinde On Shivsena NCP Alliance : 'महाराष्ट्रात अनेक निवडणुका चालू आहेत. मात्र सोलापूरच्या निवडणुकांमध्ये दररोज मोठ्या घडामोडी घडत आहेत. काही पक्ष लोकांचा फक्त फायद्यासाठी वापर करतात आणि नंतर सोडून देतात. एकनाथ शिंदेंचा केवळ वापर करून घेतला आपण सर्व तर साधी माणसं आहोत.'

Jagdish Patil

Solapur News, 27 Nov : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीतील मित्र पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. नगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपच्या विरोधात लढत आहे.

त्यासाठी शिंदेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडी केल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे भाजपनेही शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधकांना जवळ करायला सुरूवात केली आहे. अशातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

कुर्डूवाडी नगरपालिकेच्या प्रचारासाठी आलेल्या शशिकांत शिंदेंनी, राज्यभरात सध्या अनेक युत्या होत आहेत. मात्र, कुर्डूवाडीतील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत झालेली आमची युती महाराष्ट्राच्या भविष्यातील नांदी देखील ठरू शकते, असं वक्तव्य केलं.

त्यांच्या या वक्तव्यामुळे भविष्यात राज्याच्या राजकारणात नवी युती उदयास येणार की काय या चर्चांना उधाण आलं आहे. शशिकांत शिंदे म्हणाले,महाराष्ट्रात अनेक निवडणुका चालू आहेत. मात्र सोलापूरच्या निवडणुकांमध्ये दररोज मोठ्या घडामोडी घडत आहेत.

काही पक्ष लोकांचा फक्त फायद्यासाठी वापर करतात आणि नंतर सोडून देतात. एकनाथ शिंदेंचा केवळ वापर करून घेतला आपण सर्व तर साधी माणसं आहोत. पण लढणारी माणसे कधीच शरणागती घेत नसतात.

कुर्डूवाडी येथे झालेली युती ही भविष्यातील नांदी सुद्धा असू शकेल,' असं सूचक वक्तव्य शिंदेंनी यावेळी केलं. तर सध्या, कुर्डूवाडी नगरपरिषद निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT