Chandrashekhar Bawankule Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election : बावनकुळे 47 हजार 412 लोकांशी बोलले; केवळ 16 जण म्हणाले, मोदी पंतप्रधान...

Vishal Patil

BJP News : 'वंचित बहुजन आघाडी' सोबत आली तर मतांचे विभाजन टाळण्यास मदत होईल, असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले होते. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. जर-तरची लढाई काँग्रेसवाले अनेकदा लढले. पण राजकारणात जर-तरला अर्थ नाही. जनता काय म्हणते, त्याला अर्थ आहे. जनता राहुल गांधींना नव्हे तर मोदींना मत द्यायला तयार आहे. मी 47 हजार 412 लोकांशी बोललो. त्यापैकी 16 लोक सोडले तर उर्वरित सर्वांनी मोदीच पंतप्रधान पाहिजे असल्याचे म्हटल्याचा दावाही बावनकुळेंनी केला आहे.  

एका सर्व्हेनुसार भाजपच्या (BJP) अनेक जागा डळमळीत आहेत. असे असताना बावनकुळे जनतेशी खोटे बोलत आहेत, असा आरोप अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला होता. या आरोपावर बोलताना बावनकुळे म्हणाले, मी 47 हजार 412 लोकांशी बोललो. त्यापैकी 16 लोक सोडले तर उर्वरित सर्वांनी मोदींजीच पंतप्रधान (PM Narendra Modi) पाहिजेत. कुठले तरी 10-15 लोक सर्वे करतात आणि सांगतात महाविकास आघाडी. सी-वोटरच्या सर्व्हेला मी मानत नाही. मात्र नांदेड, बारामतीसह (Baramati) राज्यात 45 पेक्षा जास्त जागा भाजप मिळवेल, हे मी दाव्याने सांगतो, असेही बावनकुळे म्हणाले.

जागावाटप कसे असेल?

शिवसेनेला जेवढ्या जागा दिल्या जातील, तेवढ्याच जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत. या अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या मागणीवर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. रस्त्यावर कितीही मागणी केली तरी राज्यातील महायुतीतील तीन नेते आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत जे ठरेल, तेच अधिकृत जागावाटप असेल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रात वनसाईड भाजप 

सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदींमध्ये आहे. म्हणून मी त्यांच्या समर्थनात सरकारमध्ये आलो आहे. शेंगदाणा, फुले, भाजीपाला विकणारा म्हणतोय मोदीजींना मते देणार. ज्या लोकांनी 65-65 वर्षे सरकार चालवले आणि त्यांनी गरीब जनतेचा विचार केला नाही. ते लोक काय मते मागणार आणि रॅली करणार आहेत. महाराष्ट्रात वनसाईड भाजप निवडून येईल, महाराष्ट्राचा मूड मोदींच्या मागे उभा आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT