Lok Sabha Election : पायलट, गेहलोत लोकसभेच्या मैदानात? काँग्रेसने कंबर कसली

Congress : विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाहीत.
Sachin Pilot, Ashok Gehlot News
Sachin Pilot, Ashok Gehlot NewsSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan News : राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर आता काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. भाजपने राज्यातील 25 पैकी 25 लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पराभवाच्या धक्क्यातून सावरत असताना बड्या नेत्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकण्याच्या तयारीत आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांनाच लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Election) उतरवण्याचा विचार पक्षाकडून सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. विधानसभेच्या निवडणुकीत (Assembly Election) पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. राजस्थानसह (Rajasthan) मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि छत्तीसगडमध्येही पक्षावर पराभवाची नामुष्की ओढवली. या हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये पक्षाची झालेली पीछेहाट रोखण्यासाठी काही दिवसांत मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Sachin Pilot, Ashok Gehlot News
India Vs Pakistan : ...तर काश्मीरची स्थिती गाझासारखी होईल! फारुख अब्दुल्लांना का सतावतेय भीती?

राजस्थानमध्ये काँग्रेसने मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. बारा दिग्गज नेत्यांना महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये काही नवीन चेहऱ्यांचाही समावेश आहे. राज्यात गेहलोत आणि पायलट यांच्यातील शीतयुध्दामुळे पक्षाला मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीतही त्याचा फटका बसू शकतो. त्यासाठी आताच दोघांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशोक गेहलोत यांना 'इंडिया' आघाडीच्या महत्त्वाच्यासमितीमध्ये स्थान देण्यात आले आहे. तर पायलट यांच्यावर छत्तीसगडची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांना मोठ्या कालावधीनंतर राज्याबाहेरील मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता लोकसभा निवडणुकीसाठीही त्यांच्या नावांवर गांभीर्याने विचार सुरू असल्याची चर्चा आहे.

Sachin Pilot, Ashok Gehlot News
Ram Mandir : प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याविषयी वृंदा कारत यांची मोठी घोषणा

गेहलोत यांना जोधपूर मतदारसंघातून तिकीट दिले जाऊ शकते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांना सीकर मतदारसंघातून तर आमदार हरीश चौधरी यांना जैसलमेर बाडमेर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. गोविंद राम मेघवाल यांना बिकानेर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे सचिन पायलट, भंवर जितेंद्र सिंह, अशोक चांदना या नेत्यांनाही मैदानात उतरवण्याची तयारी काँग्रेस करू शकते, असे जाणकार सांगतात.

Edited by Rajanand More

Sachin Pilot, Ashok Gehlot News
Pakistan Elections : पाकिस्तानात घडणार इतिहास; पहिल्यांदाच हिंदू महिला उतरली निवडणुकीच्या रिंगणात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com