Solapur Lok Sabha Election 2024 News
Solapur Lok Sabha Election 2024 News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News: मी सोलापूरची लेक, पुढील 40 दिवस याचं भान राखा! प्रणितींच्या शुभेच्छांचा सातपुते स्वीकार करणार का?

Mangesh Mahale

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पाचव्या यादीत सोलापूर लोकसभेसाठी आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सोलापूरसाठी महाविकास आघाडीकडून (Solapur Lok Sabha Election 2024) काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) उमेदवार आहेत.

सातपुतेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणिती यांनी टि्वट करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'बाहेरचा असो की येथील सोलापुरात सर्वांना आपले मत मांडण्याची मुभा मिळते, असे ट्विट करीत प्रणिती यांनी सातपुतेंना चिमटा काढला आहे. प्रणितींच्या या शुभेच्छांचा सातपुते कशा पद्धतीने स्वीकार करतात हे लवकरच समजेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार हा सोलापूर लोकसभेचा प्रचाराचा मुद्दा बनण्याची शक्यता आहे. यावरून राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपकडून सोलापूर मतदारसंघासाठी माजी खासदार अमर साबळे, शरद बनसोडे, पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्यासह काही स्थानिक माजी नगरसेवकांची नावे चर्चेत होती. मात्र, आमदार प्रणिती शिंदेंशी टक्कर देण्यासाठी तेवढ्याच ताकदीचा उमेदवार म्हणून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना भाजपने सोलापूरच्या मैदानात उतरवलं आहे. राम सातपुते यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांचा सोलापूर शहर मध्य सोडता इतर पाच मतदारसंघांत भाजप आणि मित्रपक्षाचे आमदार आहेत. येथे महाविकास आघाडीपेक्षा महायुतीची असणारी संघटनात्मक ताकद मोठी आहे. त्याचा फायदा राम सातपुतेंना होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा २०१४ आणि २०१९ च्या सोलापूरच्या लोकसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव झाला आहे. वडिलांच्या पराभवाची सल मुलगी म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांच्या मनात आहे.

यंदाच्या लोकसभेसाठी विजयश्री खेचून आणण्यासाठी प्रणिती यांनी रणनीती आखली असून, प्रचारास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून राम सातपुतेंचे यांचे तगडे आव्हान प्रणिती यांच्यासमोर आहे. प्रणिती या आपल्या वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार की, भाजप विजयाची हॅटट्रिक साधणार हे चार जून रोजी समजेल.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT