महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीतील हालचालींना वेग आला आहे.
भाजपसमोर संकट निर्माण झाले असून छोट्या पक्षाने स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आहे.
या निर्णयामुळे महायुतीतील एकतेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Mumbai News : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची जोरदार तयारी सुरू आहे. भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मोर्चेबांधणीला वेग आला असून त्याचीही जोरदार चर्चा होत आहे. एकीकडे महायुतीतील तिन्ही मोठे पक्ष आप आपल्या तयारीला लागले असतानाच आता भाजपसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. सत्ते सहभागी असणाऱ्या छोट्या पक्षाने थेट स्वबळाची भाषा करत महायुतीविरोधातच दंड थोपाटले आहे. यामुळे स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या भाजपसह आता महायुतीलाच मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
एकीकडे राज्यात आगामी स्थानिकसाठी महायुतीतील भाजप आणि इतर दोन्ही पक्ष तयारी करत आहेत. राज्य पातळीला महायुतीच म्हणून लढण्याची तयारी केली जात असतानाच जिल्हा पातळीवर मात्रा स्वबळाची भाषा भाजपसह शिवसेना करताना दिसत आहे. यामुळे अनेक जिल्ह्यात सध्या महायुतीत खटके उडताना दिसत आहेत.
अशातच महायुतीत राज्यात सहभागी असणाऱ्या आणि केंद्रात मंत्री पद मिळालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने थेट भाजपला इशारा दिला आहे. भाजपने यावेळी पक्षाला योग्य सन्मान जनक जागा न दिल्यास आपण स्वबळावर लढू अशी घोषणाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. यामुळे आता प्रामुख्याने भाजपसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर मोठे भाष्य केले. त्यांनी, पदाधिकाऱ्यांना पालिका निवडणूकीबाबत महत्वाच्या सूचना देताना, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपने जागा दिल्या तर ठीक. अन्यथा स्वबळावर निवडणुका लढवा, असे आदेशच कार्यकर्त्यांना दिले आहेत. यामुळे आता महायुतीत जागावाटपावरून ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जातेय.
यावेळी रामदास आठवले यांनी, आपण महायुती सोडून दुसऱ्या कोणाशीच युती करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर स्थानिक पातळीवर उद्धव ठाकरे-शरद पवार आणि काँग्रेस पक्षाशी कोणत्याही परिस्थितीत युती करू नये असा सज्जड दमही त्यांनी कार्यकर्त्यांना भरला आहे. तर यावेळी त्यांनी आपण आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यास त्याचा दलित समाजाला अत्यानंद होईल असेही त्यांनी म्हटलं आहे. यामुळे महाराष्ट्राच्या उलथापालथ होईल, असे सांगताना त्यांनी भाजपसोबत युती न झाल्यास आरपीआय आठवले गट स्वबळावर निवडणूक लढवेल असे संकेत दिले आहेत.
प्रश्न 1: महायुतीत सध्या कोणते संकट उभे आहे?
उत्तर: छोट्या पक्षाने स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा केल्याने महायुतीत संकट निर्माण झाले आहे.
प्रश्न 2: कोणते मोठे पक्ष महायुतीत आहेत?
उत्तर: भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट).
प्रश्न 3: छोट्या पक्षाच्या निर्णयाचा परिणाम काय होऊ शकतो?
उत्तर: महायुतीत फूट पडण्याची आणि भाजपच्या विजयावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.