
Devendra Fadnavis News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक आणि गणपती आगमनाच्या कालावधीत होणारे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन यामुळे महायुती बॅकफूटवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्बल दीड तास मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान 'वर्षा'वर बैठक झाली. या बैठकीत रणनिती निश्चित करण्यात आली.
आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका या महायुतीमध्ये लढण्यात याव्यात. जिथे एकमत होत नाही तेथे चर्चा करून लढण्याबाबत निर्णय झाल्याचे समजते. स्थानिक स्वराज संस्थांमध्ये विरोधी पक्षांना संधी मिळू नये यासाठी महायुतीमध्ये निवडणूक लढण्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जोर दिल्याची माहिती आहे.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजाच्या उपसमितीचे अध्यक्षपद राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आक्रमक पवित्र पाहाता. हे आंदोलन कसे हातळायचे यावर या बैठकीत खलबंत झालं. गणेशोत्सवाच्या काळात होत असलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनावर ताण येण्याची शक्यता गृहित धरून नियोजन केले जाणार असल्याचेही समजते.
स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या आधी महामंडळावर नियुक्त्या करण्यात याव्यात यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आग्रही होते. त्यामुळे लवकरच महामंडळावरील नियुक्त्या करत महायुतीमधील कार्यकर्त्यांनी संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मागली काही काळात महायुतीमधील मंत्री, आमदार अडचणीत आले. भ्रष्टाचाराचे आणि गैरवर्तनाचे प्रकारांचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये वाद टाळण्यासाठी आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप टाळण्यासाठी समन्वय ठेवण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. समन्वयासाठी कोणत्या गोष्टी निश्चित करण्यात आल्या आहेत याची माहिती देखील मंत्री, आमदारांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.