Milk Adulteration Crack Down by Pune Rural Police and FDA; Tukaram Mundhe sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Tukaram Mundhe Action : तुकाराम मुंढेंच्या FDAची धडक कारवाई, एकाचवेळी सहा जिल्ह्यांत छापेमारी, 13 जणांना अटक; दूध भेसळ माफियांचे धाबे दणाणल

Pune Rural Police and FDA Crack Down on Milk Adulteration Network : दुधात भेसळ करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पुणे ग्रामीण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करत कंबरडे मोडले आहे.

Sudesh Mitkar

Pune News : दुधात भेसळ करून सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा पुणे ग्रामीण पोलीस आणि धडाकेबाज आयएएस ऑफिसर तुकाराम मुंडे आयुक्त असलेल्या अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे.

पुणे, सोलापूर, सांगलीसह तब्बल ६ जिल्ह्यांत एकाच वेळी टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल अडीच कोटी रूपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी १३ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या धडक कारवाईमुळे दूध भेसळ करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत. तर मंचर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना घोडेगाव न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

४५ अधिकाऱ्यांची ६ जिल्ह्यांत एकाच वेळी छापेमारी

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि 'एफडीए'च्या ४५ सदस्यांच्या विशेष पथकाने अत्यंत गोपनीयतेने ही मोहीम आखली होती. पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, सांगली आणि भिवंडी येथे एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. मंचरमधून दोन संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर या संपूर्ण रॅकेटची पाळेमुळे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तब्बल १३ जणांना अटक केली.

पाणी नव्हे, थेट रासायनिक पदार्थ

तपासात समोर आलेली भेसळीची पद्धत अत्यंत धक्कादायक आणि नागरिकांचे डोळे पांढरे करणारी आहे. दूध उत्पादकांकडून डेअरीत येणाऱ्या शुद्ध दुधात मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जात होती. ५०० लिटर दुधात सुमारे ३०० लिटर, तर १००० लिटर दुधात तब्बल ५०० लिटरपर्यंत भेसळ केली जात होती. दुधाची मात्रा वाढवण्यासाठी त्यात वास न येणारा शॅम्पू, दुधाची पावडर, घातक रासायनिक पदार्थ आणि पाणी मिसळून हे बनावट दूध तयार केले जात होते.

नामांकित कंपन्यांना पुरवठा!

हे विषारी आणि भेसळ युक्त दूध बाजारातील नामांकित ब्रँड्स आणि कंपन्यांना पुरवले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे, याच दुधापासून बनलेले पनीर, खवा आणि इतर दुग्धजन्य पदार्थ गेल्या दोन वर्षांपासून सर्वसामान्यांच्या घरा घरांपर्यंत पोहोचत होते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तपासाची व्याप्ती वाढणार!

या रॅकेटमध्ये राज्यातील काही बडे मासे आणि डेअरी चालक सामील असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पुणे ग्रामीण पोलीसांची स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आगामी काळात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT