Tukaram Mundhe Effect: सिन्नरमध्ये दूध भेसळीचा मास्टर माईंड; १७ लाखाचे भेसळीचे रसायन आणि साहित्य जप्त!

Nashik FDA Tukaram Mundhe milk adulteration Sinnar 17 lakhs stock seized-एफडीएच्या कारवाईत आढळला धक्कादायक दूध भेसळीच्या रसायनांचा साठा
Tukaram-Mundhe
Tukaram-MundheSarkarnama
Published on
Updated on

Sinner News: सिन्नरच्या पूर्व भागात दूध भेसळीचे मोठे रॅकेट उघड झाले आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये लाखो रुपयांचा भेसळीचा रसायन साठा जप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

शनिवारी सकाळीच सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शहा, कारवाडी पुतळेवाडी आणि परिसरातील दूध संकलन केंद्रांवर कारवाई झाली. एकाच वेळी मोठ्या पोलीस बंदोबस्त ही कारवाई सुरू झाली. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी त्याचे स्वागत केले. 

या कारवाईमुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने दूध भेसळीसाठी साहित्य कोण पुरवतो? याचा शोध सुरू केला. या कारवाईमुळे अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या शोध मोहिमेत यंत्रणेला मोठे घबाड हाती लागले. 

Tukaram-Mundhe
Tukaram Mundhe latest FDA action : तुकाराम मुंढेंचा मुंबईत धडाका! FDAची मोठी कारवाई, टनभर भेसळयुक्त मिठाई अन् मावा जप्त

रामपूर येथील प्रशांत रोहिदास काळे यांच्या दुकानावर तसेच अन्य ठिकाणी केलेल्या तपासणीत धक्कादायक साठा हत्ती लागला. यामध्ये सोनल कंपनीच्या स्कीम मिल्क पावडरच्या २५ किलोच्या साठ बॅगा, वे परमिट पावडर सोनल कंपनीच्या ५८ बॅगा आणि लॅक्टोज रिच दिप्रोनाइज परमिट पावडरच्या ४९ बॅगा सापडल्या. हा साठा कोणाला विक्री केला जाणार होता आणि दूध भेसळ कोण करणार होते याची माहिती काळे देऊ शकला नाही. सुमारे १७.३७ लाखांचा हमाल प्रशासनाने जप्त केला. याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Tukaram-Mundhe
Tukaram Mundhe: सिन्नर हादरले; दूध केंद्रांवर भल्या पहाटे ‘एफडीए’चे छापे, भेसळीच्या साहित्याचा दिवसभर वस्त्यांवर जाऊन शोध!

शहा आणि परिसरात दूध भेसळीचा कारखाना राजरोसपणे सुरू होता असे यावरून आढळले. याबाबत नागरिकांना आधीच माहिती होती. अनेक नागरिकांनी याविषयी तक्रारी केल्या होत्या. कारवाई झाल्याने नागरिकांनी त्याचे स्वागत केले आहे. 

अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकारी संदीप दयानंद तोरणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. दिवसभर सुरू असलेला शोध दुसऱ्या दिवशीही सुरू ठेवण्यात आला आहे. गेले काही दिवस दूध भेसळ विषयी स्थानिक पातळीपासून तर विधिमंडळापर्यंत चर्चा सुरू होती. नंतरही सिन्नर मध्ये भेसळीचे साहित्य व गैरप्रकार सुरू असल्याने भेसळ करणाऱ्यांच्या धाडसाची वेगळीच चर्चा सुरू आहे. त्यांना कोणाचा राजकीय पाठिंबा आहे, याचा शोध सुरू आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com