Sharad Pawar Retirement News update
Sharad Pawar Retirement News update  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar News : शरद पवारांच्या निर्णयावरुन पदाधिकारी आक्रमक ; सोलापुरात NCP ने घेतला 'हा' निर्णय

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar Retirement News : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार असल्याचे जाहीर केले आहे. यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. राज्यभर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी नाराजी व्यक्त केली आहे.

पवारांनी निर्णय मागे घ्यावा, यासाठी त्यांची मनधरणी करीत आहे. पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीतील अनेक नेते आणि कार्यकर्ते मात्र भावूक झाले आहेत. तसंच हा निर्णय तत्काळ मागे घ्या, अशीही विनंती ते करताना दिसत आहेत. कार्यकर्ते उपोषणालाही बसले होते.

सोलापूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष भारत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक पक्ष कार्यालयात झाली. यावेळी सर्वच मान्यवरांनी पक्षाचे संस्थापक शरद पवारांच्या निर्णयाने देशाला धक्का बसला आहे, अशी खंत व्यक्त केली.

आपल्या नेत्यांनी राजकीय निवृत्ती मागे न घेतल्यास शहरातील अध्यक्षासह सगळेच पदाधिकारी आणि प्रदेश प्रतिनिधी सामुहिक राजीनामा देतील,असा एकमुखी ठराव करून प्रदेश कार्यालयात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा मागे घेऊन आजीवन अध्यक्षपदी राहावे, असे साकडे सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकाऱ्यांकडून घालण्यात आले. निर्णय न बदलल्यास प्रदेश आणि शहर स्तरावरील सर्वच पदाधिकारी सामुहिक राजीनामा देतील, असा एकमुखी निर्णय यावेळी घेण्यात आला.

पवारांमुळेच नेते आणि कार्यकर्ते घडले आहेत. देशाच्या विविध क्षेत्राची प्रगती झाली आहे. लाखो कार्यकर्त्यांना त्यांनी बळ दिले आहे. राजकारणातील सर्वच पक्षांचे ते आदर्श आहेत. त्यांच्या नेतृत्वाचे छत्र नसल्यास राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निरुत्साही होईल, त्यामुळे पवारांनी राजकीय निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी असे साकडे घातले.

प्रदेश सचिव संतोष पवार, सर्वश्री जनार्दन कारमपुरी, मनोहर सपाटे,महेश गादेकर,शंकर पाटील,नाना काळे,विद्याताई लोलगे,जुळे सोलापूरचे डाॅ.बसवराज बगले, तौफिक शेख, महिला अध्यक्षा सुनिता रोटे, कार्याध्यक्षा लताताई ढेरे, लताताई फुटाणे, शिकलगार, सुनिता गायकवाड, सायरा शेख,अमीर शेख, गफूर शेख, नुरोददीन मुल्ला, चंद्रकांत पवार, मुसा अत्तार, किरण मोहिते आदी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT