Chandrakant Patil addressing supporters during the Gadhinglaj municipal election campaign. The political rally highlights rising tensions in Maharashtra politics. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahayuti Politics : मंत्री मुश्रीफांना चंद्रकांत पाटलांचा दम, थेट तिजोरीचा मालक काढत ठणकावलं

Gadhinglaj municipal election : गडहिंग्लज नगरपालिकेमध्ये जनता दल जनसुराज्य शक्ती भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त चंद्रकांत पाटील आले होते. यावेळी त्यांनी मंत्री मुश्रीफ यांना चांगलेच धारेवर धरले. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते त्यांचा प्रचार करताना दिसत आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur News, 25 Nov : नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा रणांगण तापत असताना त्यामध्ये आता मंत्र्यांनी उड्या घेतल्या आहेत. आपाल्या ताब्यात नगरपालिका कशा? येतील यासाठी सर्वच मंत्र्यांनी जोडण्या लावायला सुरुवात केली आहे.

अशातच राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनाच दम दिला आहे. राज्याची तिजोरी आमच्याकडे आहे. त्यामुळे आमच्या उमेदवारांनाच मत द्या असं कोणी म्हणत असेल तर त्या तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे.

मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येत नाही. परवानगी शिवाय तिजोरी उघडली तर काय म्हणतात हे सर्वांना माहीत आहे, असा उलट टोला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफांचा उल्लेख न करता लगावला आहे.

गडहिंग्लज नगरपालिकेमध्ये जनता दल जनसुराज्य शक्ती भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त चंद्रकांत पाटील आले होते. यावेळी त्यांनी मंत्री मुश्रीफ यांना चांगलेच धारेवर धरले. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते त्यांचा प्रचार करताना दिसत आहेत. महायुतीमध्ये एकमेकांवर टीका करायचा नाही असे ठरले आहे.

त्यामुळे तेही नियम पाळताना दिसत आहेत. पुढच्या चार ते पाच दिवसात त्यांनी नियम मोडला तर आम्ही देखील गप्प बसणार नाही.असा इशारा मंत्री पाटील यांनी दिला. हसन मुश्रीफ नेहमी युतीचा आग्रह धरतात. कागल नगरपालिकेमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती व्हायला हवी होती.

मात्र घाटगे आणि मुश्रीफ यांना एकत्र येण्यासाठी भाजपला आदर्श व्हावे लागले. त्यांना कागल मध्ये आमची मदत हवी असेल तर चंदगड मध्ये त्यांना आम्ही नको आहोत. पण हे संधी साधू राजकारण जास्त काळ चालणार नाही असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT