Gondia News, 25 Nov : गोंदिया तालुक्यातील खामखुरा येथील ग्रामविकास अधिकारी आर. के. भांडारकर यांच्या मनमर्जी कारभाराला कंटाळून सोमवारी सायंकाळी सरपंच व उपसरपंचांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. यामुळे येथील ग्रामपंचायत कार्यालय कुलूपबंद झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खामखुरा या गावातील जुन्या विहिरीवर झाकण्यासाठी लोखंडी कठड्याची ऑर्डर तुमसर तालुक्यातील सिहोरा येथील लकीश्या इंटरप्राईजेस यांना देण्यात आली होती. ते साहित्य गावात आणल्यानंतर सरपंच व उपसरपंच यांनी ते निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे विहिरीवर लावण्यास मनाई केली होती.
मात्र, ग्रामविकास अधिकारी यांनी सरपंच, उपसरपंच यांचे म्हणणे धुडकावून लावून विहिरीवरील कठडे लावण्यास सांगितले. सोमवारी सायंकाळी ही बाब सरपंच व उपसरपंच यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हरकत घेऊन काम करण्यास मनाई केली. ग्रामविकास अधिकारी हे कार्यालयात वेळेवर येत नाही.
त्यामुळे जनतेच्या दाखल्यांवर सह्या होत नाही. एक दाखला मिळविण्यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागतो. तसेच या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या दुर्लक्षितपणामुळे अनेक देणेकरांचे देणे वेळेवर होत नाही. मासिक सभा व ग्रामसभेत झालेले ठराव संबंधित विभागाला वेळेवर जायला पाहिजे.
मात्र, ग्रामविकास अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे तीन ते चार महिन्यांच्या कालावधीनंतर संबंधित विभागाला नोटीस जातात. त्यामुळे गाव विकासात अडथळे निर्माण होत आहेत. त्यानंतर याकरता गावकरी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत कमिटीला कारणीभूत ठरवितात.
अशा कामचुकार ग्रामविकास अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात यावी. ग्रामविकास अधिकाऱ्याचे असे मनमर्जी कारभार असल्याने शेवटी सरपंच रेखा सयाम व उपसरपंच निप्पल बरैया यांनी ग्रामविकास अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले आहे.
ग्रामविकास अधिकारी आर. के. भंडारकर हे स्वतःच्या मनमर्जीने कामे करतात. ते पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेत नाही. तसेच वरिष्ठ अधिकारीसुद्धा ग्रामविकास अधिकाऱ्याची बाजू घेतात. त्यामुळे गाव विकास करणे शक्य होत नाही.
आता गटविकास अधिकारी येतील तेव्हाच ग्रामपंचायत कार्यालय सुरू होईल, असं उपसरपंच निप्पल बरैया यांनी सांगितलं. तर या प्रकरणावर बोलताना ग्रामविकास अधिकारी आर. के. भांडारकर म्हणाले, मी आपणास रेकॉर्ड पाहूनच सांगू शकतो. मात्र, आता रेकॉर्ड कुलूप बंद झाल्यामुळे काहीच सांगू शकत नाही.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.