Kolhapur: राष्ट्रवादी शरद पवारांची की अजित पवारांची यावर निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण निकाल दिल्यानंतर राष्ट्रवादी ही अजित पवारांची झाल्यानंतर दादांच्या गटात उत्साहाचे वातावरण आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत सत्तेतील मंत्री आणि आमदारांनी केले. कोल्हापूरचे पालकमंत्री आणि उच्च वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे देखील त्यात मागे नव्हते. त्यांनी आपल्या फेसबूक पेजवरून 'आता वेळ बदलली आहे' अशी पोस्ट करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले. पण नेटीजन्सनी मुश्रीफ यांच्या या पोस्टचा चांगलाच समाचार घेतला आहे. एकंदरीतच आगामी विधानसभा निवडणुकीत काटे उलटे फिरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हसन मुश्रीफ यांनी फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर त्याला जवळपास 100 पेक्षा अधिक कमेंट आले आहेत. केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच त्यांच्या या भूमिकेचे समर्थन काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. मात्र सर्वाधिक जास्त विरोध मुश्रीफ यांच्या भूमिकेला झाला आहे. अक्षरशः नेटकऱ्यांनी मुश्रीफ यांच्या विरोधातच कमेंट्स चा पाऊस पाडला आहे.
हरिप्रसाद रोगे हे कमेंट मधून म्हणतात, तुमची वेळ भरली आहे आता घटका भरली आहे. तर शरद पवार हा युजर करता मुश्रीफांच्या कमेंट मध्ये सांगत आहे. की, साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अजूनही विचार करा मंत्रिपद सोडा क्रांती होईल. तर इंद्रजीत पाटील म्हणतात की, पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचे? हे कागलची जनता येत्या निवडणुकीत दाखवून देईल असा इशाराही यूजरकर्त्याने दिला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पालकमंत्री मुश्रीफ यांच्याबरोबर भाजपच्या मंत्र्यांना देखील युजरकर्त्यांनी टार्गेट केले आहे, प्रकाश कांबळे नावाचा युजर करता यांनी भाजपवर निशाणा साधत,आपला पक्ष न फुटू देता, दुसऱ्याचे पक्ष फोडून आनंद व्यक्त करणारे,अनाजी पंत आज खुश झालेत.याचे दुःख आहे. राष्ट्रवादी, शिवसेना पक्ष फुटले की फोडले..? हे खरे महाराष्ट्राचे दुःख आहे, अशी प्रतिकिया दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.