Satara News: सातारा लोकसभेला महायुतीत ट्विस्ट;गोरेंनी वाढवलं भोसलेंचं टेन्शन; उदयनराजे अडचणीत...

Satara Lok Sabha Constituency: मी कोण तिकिट वाटपाचा अधिकार मला नाही...
Satara Lok Sabha Constituency
Satara Lok Sabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Satara Political News : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीत अजून चाचपणी सुरू आहे. उमेदवारी कोणाला मिळणार यांचा निर्णय दिल्लीत पार्लमेंटरी बोर्ड घेणार आहे. यावर उमेदवार कोण असणार याबाबत कोणी थेट बोलत नाहीत. पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असे सांगितले जात आहे. गेल्या महिनाभरापासून सातारा लोकसभा मतदार संघात उदयनराजे यांनी भाजपाच्या तिकिटावर लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

मात्र, कराड तालुक्यातील वाठार येथील भाजपाच्या जाहीर सभेत माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी उदयनराजेंची अडचण करणारी इच्छा व्यक्त केल्याने तर डॉ. अतुल भोसले बुचकाळ्यात पडल्याचे दिसले. गोरेंच्या मागणीमुळे महायुतीत ट्विस्ट निर्माण झाला आहे.   

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते 131 कोटी रूपयांच्या विकासकामांच्या उदघाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमात जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी मंत्री रविंद्र चव्हाण, लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, विधान परिषदेचे माजी आमदार आनंदराव पाटील, मनोज घोरपडे उपस्थित होते. भाजपाच्या आमदार जयकुमार गोरे यांनी डॉ. अतुल भोसले यांनी विधानसभा निवडणूक नव्हे तर सातारा लोकसभा निवडणूक लढवावी, अशी इच्छा व्यक्त केली.  

सातारा लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. महायुतीतून तीन्ही घटक पक्षाकडून मतदार संघावर दावा केला जात आहे. भाजपाकडून सध्या राज्यसभेवर असलेले उदयनराजे पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून तयारीला लागले आहेत.

लोकसभा प्रभारी म्हणून अतुल भोसले हे आहेत. सातारा लोकसभेसाठी उमेदवार जाहीर झाला नसला तरी उदयनराजे यांचे एकमेव नाव भाजपाकडून आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत भाजपाचे माण-खटावचे जयकुमार गोरे यांनी केलेल्या मागणीमुळे जाहीर सभेतील वातावरण जरा गंभीर झाल्याचे पाहायला मिळाले. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तिकिट वाटणारे दिल्लीत, सांगणारे मुंबईत आपला काय संबध

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून आता मतदारांनी संधी देणे गरजेचे आहे. आम्ही तर म्हणतो, अतुल बाबांनी लोकसभेची निवडणूक लढवावी. पण, अतुल बाबा म्हणतायत, मला विधासभेत जायचं आहे. परंतु, आमची इच्छा आहे, बाबांनी खासदार व्हावं, असे जयकुमार गोरे म्हणाले.

यावेळी गोरेंनी अतुल भोसले यांच्याकडे पाहताच ते बुचकाळ्यात पडल्याचे दिसताच गोरे म्हणाले, तो आजचा विषय नाही. मी कोण तिकिट वाटपाचा अधिकार मला नाही. शेवटी तिकीट वाटणारे दिल्लीत बसलेत, सांगणारे मुंबईत बसलेत. आपला काय संबध पण आपल्या सगळ्याच्या भावनेचा विषय होता,"

Satara Lok Sabha Constituency
Jayant Patil: जानकरांविषयी विशेष जिव्हाळा, पण... असे जयंत पाटील का म्हणाले..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com