Kolhapur News, 23 Sep : राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातलं आहे. बीड आणि धाराशिवमध्येही पावसाने कहर केला आहे. पावसामुळे सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे.
याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली जात आहे. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्या कोल्हापुरात बोलत होत्या.
सुळे यांनी यावेळी मागील काही महिन्यापासून कर्जमाफीची मागणी करत असल्याचं सांगितलं. शिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ न दिल्यामुळे थेट अमित शहांची भेट घेत अमित शहांना राज्य सरकारला सूचना देण्याची विनंती केल्याची माहितीही त्यांनी यावेली दिली.
माध्यमांशी बोलताना त्या म्हणाले, 'मागील अधिवेशनात मी महाराष्ट्र सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली होती. मात्र, हे सरकार त्याकडे लक्ष देत नसल्याने, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांना आम्ही राष्ट्रवादीचे 8 खासदार भेटले होते.
यावेळी कर्जमाफी संदर्भात महाराष्ट्र सरकारला आपण सूचना देण्याचीही विनंती शहांना केली होती असंही त्या म्हणाल्या. शिवाय गेल्या 2 महिन्यापासून राष्ट्रवादी ही मागणी सातत्याने करत आहे. मात्र, हे सरकार असंवेदनशील आहे. हे उघड्या डोळ्यांनी दिसत आहे, अशी टीका त्यांनी सरकारवर केली.
तर वर्षभरापूर्वी हे सरकार आम्ही सरसकट कर्जमाफी करू असं सांगत होतं. एक वर्ष होत आले तरी हे आश्वासन पूर्ण झाले नाही. शेतकऱ्यांचं कंबरडं या सरकारने मोडलं आहे. सरकारने तातडीने ओला दुष्काळ आणि सरसकट कर्जमाफी करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही सुळे यांनी यावेळी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.