
Maharashtra Heavy Rain : राज्यात मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात तर अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत अतिवृष्टीमुळे आठ जणांचा जीव गमवावा लागला आहे.
मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे आधीच अवकाळी आणि आता अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलं असून आता 'हिंदू नव्हे तर बळीराजा खतरे में है!' त्यामुळे अशा परिस्थितीत आता पंचनाम्याचा हट्ट न धरता आजच्या कॅबिनेट बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवारांनी एक्सवर पोस्ट करत सरकारला शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे. ही मागणी करत असताना त्यांनी सरकारला सुनावलंही आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, अतिवृष्टीने राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने मायबाप सरकारला सांगायचंय, आज जाती-धर्मात वाद करण्यापेक्षा हिंदू, मुस्लिम, ओबीसी, एससी, एसटी या सर्वच समाजाचे शेतकरी अडचणीत आहेत.
म्हणूनच राजकारण बाजूला ठेवून माणुसकी धर्माला आणि महाराष्ट्र धर्माला जागून शेतकऱ्याला तातडीने मदत करण्याची नितांत गरज आहे. आधी अवकाळी आणि आता अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय. शेतीचं झालेलं नुकसान बघितलं तर शेतकऱ्यांना निकषापेक्षा कितीतरी जास्त मदत करण्याची गरज आहे.
आज हिंदू नाही तर बळीराजा खतरे में है! अशा परिस्थितीत आता पंचनाम्याचा हट्ट न धरता आजच्या कॅबिनेट बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये मदतीची घोषणा करा आणि हीच योग्य वेळ असल्याने कर्जमाफीही जाहीर करा, ही आक्रोश करणाऱ्या बळीराजाच्यावतीने कळकळीची विनंती, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे आता राज्य सरकार आज अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी काही मदत जाहीर करणार का? हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.