Setback for Jayant Patil in Maharashtra Politics : सांगली जिल्ह्यात भाजप आणि माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यातील संघर्ष पेटला आहे. त्यातच भाजपच्या वर्तुळातून जयंत पाटील यांना धक्का देणारी बातमी समोर येत आहे. विधानपरिषदेचे विद्यमान आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव पुढील आठवड्यात भाजप प्रवेश करणार असल्याचे माहिती समोर येत आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसणार आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात अनेक इच्छुकांनी मतदार नोंदणीवरून शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून स्पर्धा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीकडे विद्यमान आमदार आहेत. पण अशा परिस्थितीत पुणे पदवीधरा मतदारसंघात महायुतीमध्ये दोन पक्षांचा दावा असला तरी येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे एका आमदारांचे पुत्र भाजपच्या वाटेवर आहेत.
आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांचा कार्यकर्त्यांसह भाजप पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरल्याची अशी माहिती समोर आली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदार यादी नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झाला. डिसेंबर 2026 मध्ये पुणे पदवीधर साठी निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी एक वर्ष अगोदरच इच्छुकांनी भाऊ गर्दी केली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार अरुण लाड हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा या मतदारसंघावर उमेदवारीसाठी दावा असणार आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांचे पुत्र शरद लाड हे भाजपमध्ये जाणार असल्याचे चर्चा चांगलीच रंगली होती. आता येत्या ७ ऑक्टोबर रोजी मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते.
दुसरीकडे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मधून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक भैय्या माने यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे. तर या मतदारसंघावर भाजपचा पूर्वीपासून दावा आहे. सध्या भाजपकडे उमेदवार नसला तरी महाविकास आघाडीतील विद्यमान आमदारांच्या चिरंजीवांना भाजपमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. लाड यांनी पदवीधरच्या उमेदवारीचा शब्द भाजप पुढे ठेवला आहे. त्याची चर्चा अंतिम टप्प्यात सुरू असल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.