Devendra Fadnavis News : ठाकरेंनी माझे बोलणे सत्य करून दाखवले! फडणवीसांनी काही तासांतच हिशेब चुकता केला..

Devendra Fadnavis mocks with witty remark : उद्धव ठाकरेंनी नेहमीच्या पध्दतीने लोकांसंदर्भात, विकासासंदर्भात, लोककल्याण, बीएमसीला, राज्याला पुढे कसे नेणार, याबाबत अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करून दाखवले, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
Uddhav Thackeray | Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात महत्वाचे :

  1. उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा पलटवार: दसरा मेळाव्यातील टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवत विकासावर एकही मुद्दा न मांडल्याचे सांगितले.

  2. “हजार रुपये वाचले” टोमणा: फडणवीस म्हणाले की, त्यांनी आव्हान दिले होते – जर ठाकरेंच्या भाषणात विकासाचा मुद्दा असेल तर ते हजार रुपये देतील; पण भाषणात विकासाचा एकही मुद्दा नसल्याने त्यांचे पैसे वाचले.

  3. भाजपवरील टीकेला प्रत्युत्तर: उद्धव ठाकरेंनी भाजपवर "फ्रीशिप देऊन पगारी मतदार तयार करत आहेत" अशी टीका केली होती, त्यावर फडणवीसांनी “निराश व्यक्ती अद्वातद्वा बोलतो” असे उत्तर दिले.

Uddhav Thackeray’s statement sparks political reactions : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यात महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल चढविण्यात आला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सडकून टीका केली होती. या टीकेला मुख्यमंत्र्यांनी काही तासांतच प्रत्युत्तर देत ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे.

मुंबईत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरूवातीलाच ठाकरेंचे आभार मानले. ते म्हणाले, मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन, की त्यांनी माझे एक हजार रुपये वाचवले. कारण मी आव्हान केलं होतं की, ठाकरेंच्या भाषणामध्ये विकासासंदर्भात एक मुद्दा दाखवा आणि हजार रुपये मिळवा.

काल मी तर त्यांचं भाषण काही ऐकलं नाही. मी ज्यांनी भाषण ऐकलं, त्यांना विचारलं की, मला एक हजार रुपयांचा फटका आहे का, उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोलले का, अख्ख्या भाषणात विकासावर ते एक मुद्दाही बोलले नाहीत. त्यांचे बोलणं म्हणजे स्वगत असतं. यावेळी तर पुढे माणसंही नव्हती, अशी स्थिती होती. पण त्यांचे आभार मानतो, असा टोला फडणवीसांनी लगावला.

Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
POK protest update : लोकांनीच सुरक्षा यंत्रणेची अब्रू वेशीवर टांगली, Video व्हायरल; ‘पाक’व्याप्त काश्मीरमध्ये आणीबाणी

ठाकरेंनी नेहमीच्या पध्दतीने लोकांसंदर्भात, विकासासंदर्भात, लोककल्याण, बीएमसीला, राज्याला पुढे कसे नेणार, याबाबत अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करून दाखवले आणि माझे हजार रुपये वाचवले, त्याबद्दल आभार मानतो, अशी खिल्ली उडवत फडणवीसांनी ठाकरेंच्या भाषणावर भाष्य केले.

भाजप सर्वांना फ्रीशिप देऊन पगारी मतदार तयार करत आहे, अशी टीका ठाकरेंनी केली होती. त्यावर फडणवीस म्हणाले, एखादा व्यक्ती निराश झाला की तो अद्वातद्वा बोलत असतो. सुज्ञ लोकांनी त्यावर बोलायचे नसते. त्याची मानसिकता बघून सोडून द्यायचे असते, असा टोला फडणवीसांनी लगावला. विरोधी पक्षाने सत्तेत असताना अशाप्रकारच्या आपत्तीमध्ये त्यांनी काय निर्णय घेतले, काय जीआर काढले, याबाबत त्यांनीच आरसा बघावा, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी अतिवृष्टीच्या मदतीबाबत विरोधकांकडून सुरू असलेला टीकेला दिले.

Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
Maratha Reservation : ‘समान आडनाव’ असेल तर मिळेल का कुणबी दाखला? मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाची व्याप्ती वाढवली...

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात काय केले?
A: महायुती सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.

Q2: फडणवीसांनी ठाकरेंच्या भाषणावर काय प्रतिक्रिया दिली?
A: भाषणात विकासाचा मुद्दा नसल्याचे सांगून खिल्ली उडवली.

Q3: “हजार रुपये वाचले” हा टोमणा कसा होता?
A: फडणवीस म्हणाले की, ठाकरेंनी विकासावर बोलले नाही म्हणून त्यांचे आव्हान पाळले गेले नाही आणि पैसे वाचले.

Q4: भाजपवर ठाकरेंनी काय आरोप केला?
A: “फ्रीशिप देऊन पगारी मतदार तयार केले जात आहेत” असा आरोप केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com