Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar: मविआ मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? शरद पवार यांनी दिलं उत्तर....

Who will be CM of MVA Sharad Pawar told: आमच्याकडे मुख्यमंत्रिपदाचे कुणालाही डोहाळे लागलेले नाही. आमचं काम हाच आमचा चेहरा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता विरोधी पक्षनेत्यांच्या चेहरा ठरवावा, असा खोचक टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी आघाडीला लगावला.

Mangesh Mahale

Maharashtra News: विधानसभा निवडणुकी धामधूम सुरु झाली आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष कार्यालयात लगबग सुरु आहे. महायुती व महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरु झाली आहे. विधानसभेचे वेध लागल्यापासूनच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण याबाबत चर्चा रंगली आहे.

कोण होणार मुख्यमंत्री? या एकाच प्रश्नांवरुन महाविकास आघाडी आणि महायुतील नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. आरोप प्रत्यारोप सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांना चिमटा घेतला होता. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले आहे.

सुरवातीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असल्याचे जाहीर करुन टाकले होते. यावर आघाडीतील दोन्ही घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती.

ऑगस्ट महिन्यात उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात हे जाहीर केलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यापैकी कुणीही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा मी त्यांना पाठिंबा देईन.

काही दिवसानंतर राऊतांनी मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरेंचा नावांचा आग्रह करणे, राऊतांनी बंद केले आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच भावी मुख्यमंत्री असल्याचे सांगितले आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मात्र सावध भुमिका घेत आपल्या पक्षातील कुणाचेही नाव मुख्यमंत्रीपदासाठी शर्यतीत नसल्याचे सांगितले आहे.

काल (बुधवारी) महायुतीच्या पत्रकार परिषदेत महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, असा प्रश्न विचारण्यात आला होता.त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते की आमच्याकडे मुख्यमंत्रिपदाचे कुणालाही डोहाळे लागलेले नाही. आमचं काम हाच आमचा चेहरा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता विरोधी पक्षनेत्यांच्या चेहरा ठरवावा, असा खोचक टोला त्यांनी आघाडीला लगावला. यावर शरद पवार यांना आज पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, "मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे आम्ही निवडणुकीनंतर ठरवू, आता चर्चा करणे योग्य नाही,"

निवडणुकीची तयारी जोरात सुरु असताना महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून जोर लावला जात आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मोठं विधान केलं आहे.आमच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार नाही हे आधीच स्पष्ट केले आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत. त्यानंतर मुख्यमंत्री कोणाला करायचे हे ठरवण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT