NCP News: राष्ट्रवादीत नाराजी नाट्य; 'एक व्यक्ती एक पद" धोरणाचं काय? दोन नेत्यांचा अजितदादांना सवाल

Women Commission Chairperson Rupali Chakankar Re-appointment: जी तत्परता रूपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यासाठी दाखवली हीच तात्परता आमच्याबाबत का? नाही असा सवाल त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना देखील विचारला आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News: विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी झाला. त्याचबरोबर रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. शहराध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा अस्त्र उपसले आहे.

दीपक मानकर (Deepak Mankar) यांनी आपल्याला योग्य न्याय मिळाला नसल्याचे सांगत शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. जी तत्परता रूपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फेर निवड करण्यासाठी दाखवली हीच तात्परता आमच्याबाबत का? नाही असा सवाल त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना देखील विचारला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यात रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre patil) यांनी देखील रूपाली चाकणकर यांच्या निवडीवरून नाराजी व्यक्त केली आहे.

रूपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या आमदारांची काल (मंगळवारी) निवड करण्यात आली. निवडीपूर्वी दीपक मानकर मी आणि अनेक पदाधिकारी यासाठी इच्छुक होतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे आम्ही एक व्यक्ती एक पद यानुसार ही मागणी केली होती.

मात्र रूपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. माझी पक्षाच्या वरिष्ठांना एवढीच मागणी आहे की एक व्यक्ती एक पद नुसार इतर महिलांना आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, ही मागणी अजितदादा पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास असल्याचे रूपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.

Ajit Pawar
Sindkhed Raja Constituency: काका विरुद्ध पुतणी लढत होणार? घरातूनच विरोध; शरद पवार कुणाला उमेदवारी देणार VIDEO पाहा

रूपाली चाकणकर यांची पुन्हा एकदा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महिला प्रदेशाध्यक्षपदावर इतर कोणाची तरी वर्णी लागावी. ही प्रमुख मागणी सध्या पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते वरिष्ठ नेतृत्वाकडे करीत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या हे नाराजीनाट्य दादा कसे शमवणार हे पाहणं महत्त्वाचे राहणार आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com