Sunil Mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara DCC Bank: सातारा जिल्हा बँकेत सलग दोन पंचवार्षिकला चिठ्ठीचा करिष्मा : कोरेगावमध्येच गतवेळी सुनील खत्रींना तर यंदा सुनील मानेंना साथ

Satara Bank Election: सातारा जिल्हा बँकेच्या कोरेगाव सोसायटी मतदारसंघात सलग दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत समान मते पडली. यंदा ईश्वर चिठ्ठीद्वारे सुनील माने विजयी ठरले.

सरकारनामा ब्यूरो

Satara Bank Election News: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत कोरेगाव तालुका सोसायटी मतदारसंघात अजब योगायोग पाहायला मिळाला. मागील वेळी सुनील खत्री हे चिठ्ठीवर निवडून आले होते. यावेळेस सुनील माने चिठ्ठीवर निवडून आले आहेत. कोरेगाव मतदारसंघासाठी हा चिठ्ठीचा खेळ सलग दोन पंचवार्षिक सुरू आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत कोरेगाव सोसायटी मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये गेली दोन वर्षे या मतदारसंघातील उमेदवार चिठ्ठीनेच निवडून येत आहे. त्यामुळे या मतदारसंघात ईश्वरी चिठ्ठीचाच करिष्मा पाहायला मिळत आहे. २०२१ च्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजप समर्थक सुनील खत्री आणि राष्ट्रवादीचे शिवाजीराव महाडिक यांच्यात लढत झाली होती. तेव्हा दोघांना समसमान ४५-४५ मते पडली होती. त्यानंतर ईश्वर चिठ्ठीद्वारे सुनील खत्री भाग्यवान विजेते ठरले होते.

आता यावर्षी २०२६ च्या निवडणुकीतही अशी परिस्थिती आली; पण सुनील खत्रींच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील माने होते. या दोन जिवलग मित्रात थेट आणि अटीतटीचा मुकाबला झाला. मतमोजणी पूर्ण झाल्यावर दोघांनाही प्रत्येकी ४४-४४ अशी समसमान मते मिळाली आणि निवडणूक थेट ‘टाय’ झाली. या मतमोजणीदरम्यान एक मतपत्रिका बाद झाली (का केली?) आणि एक चिठ्ठी फाटली, (का फाडली?) त्यामुळे निकालावरून दोन्ही बाजूंत वाद निर्माण झाला.

योगायोगाची चर्चा

समान मतांमुळे या जागेचा अंतिम फैसला पुन्हा एकदा ‘ईश्वर चिठ्ठी’च्या माध्यमातून झाला. यामध्ये यावेळेस सुनील माने भाग्यवान ठरले आणि विजयी झाले. त्यामुळे या दोन्ही मित्रांना एकापाठोपाठ बँकेत संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राजकीय वर्तुळात या अनोख्या योगायोगाची आणि नियतीच्या खेळाची जोरदार चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT