MNS News: महाराष्ट्रावर दुष्काळाचं भीषण संकट.. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची दिवाळीच्या तोंडावर मोठी घोषणा

Maharashtra Drought News | Raj Thackeray Announcement: राज्य सरकारनं यंदाच्या वर्षी राज्यातील 358 पैकी 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पावसानं एनवेळी दगा दिल्यानं काही लाख हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचं नुकसान झालं आहे,तर दुसरीकडे दुष्काळाच्या झळा सहन करत बळीराजा एक एक दिवस काढतो आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News: राज्य सरकारनं यंदाच्या वर्षी राज्यातील 358 पैकी 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पावसानं एनवेळी दगा दिल्यानं काही लाख हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचं नुकसान झालं आहे, तर दुसरीकडे दुष्काळाच्या झळा सहन करत बळीराजा एक एक दिवस काढतो आहे. याचदरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळीपूर्वीच मोठा निर्णय जाहीर केला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी(ता.4 नोव्हेंबर) सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. मनसेकडून दरवर्षी दिवाळी दरम्यान, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात साजरा होणारा दीपोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेकडून दरवर्षी शिवाजी पार्कवर आकर्षक रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी करत धुमधडाक्यात दीपोत्सव साजरा केला जातो.

राज ठाकरेंनी व्हिडीओद्वारे मनसेकडून दरवर्षी साजरा होणारा दीपोत्सव यंदा होणार नसल्याची घोषणा केली आहे. त्या व्हिडीओमध्ये ते म्हणतात, दीपोत्सवाला प्रचंड उत्साह असतो. इथे शिवाजी पार्क मैदानामध्ये रोषणाई केलेली असते, फटाक्यांची आतषबाजी असते. ती आतषबाजी पाहण्यासाठी म्हणून महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या आहेतच, मुंबई, ठाणे, इतर सर्व ठिकाणच्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोकं तो दीपोत्सव पाहण्यासाठी म्हणून आवर्जून इथे येतात आणि त्याचा आनंद लुटत असल्याचंही राज ठाकरे म्हणतात.

तसेच सगळेजण शिवाजी पार्कवर दीपेत्सवाला खूप इथे मजा करत असतात. परंतु या वर्षीचा दीपोत्सव हा साजरा न करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि याचं एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये असलेला, आलेला आणि येऊ घातलेला हा जो भयानक दुष्काळ आहे, या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारचा उत्सव साजरा व्हावा, असं मनाला काही पटलं नसल्याची भावनाही मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरेंनी यावेळी स्पष्टपणे बोलून दाखवली.

Raj Thackeray
PCMC News : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांना तीन लाखांचा बोनस, कर्मचाऱ्यांना 60 हजार; सगळ्यांची दिवाळी गोड!

राज ठाकरे या व्हिडीओमध्ये म्हणतात, महाराष्ट्र राज्य सध्या अत्यंत एका विचित्र अवस्थेमधून जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आज पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, दुष्काळ तर भयानक आहे आणि येणार आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण ज्या उत्साहामध्ये दिवाळी साजरी करतोय ते पाहणं हे आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या आपले बांधव-भगिनी, या भगिनींना काय वाटत असेल, त्यांच्या कच्च्या-बच्च्यांना काय वाटत असेल, मला असं वाटतं या गोष्टींचा आपणच विचार केला पाहिजे.

आणि हा सारासार विचार करता, कारण आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 1972 पेक्षाही जास्त भयानक हा मोठा दुष्काळ असेल आणि हे त्यांनी अगोदर जाहीर करून देखील मला असं वाटतं सत्ताधारी पक्षातल्या लोकांना बहुदा ते समजलं नाही आणि ते गरबा खेळत बसले. असो, तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु इथे दिवाळी हा सण साजरा करत असताना, अशा प्रकारचा दीपोत्सव साजरा करत असताना मनाला ते काही पटत नाही आणि म्हणून या वर्षी हा निर्णय घेतला की हा दीपोत्सव साजरा करायचा नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray
Nitesh Karale New Political Party : शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून हकालपट्टी, आता कराळे मास्तर नवा पक्ष काढणार? सहा जिल्ह्यांचा दौरा ठरला!

राज ठाकरेंनी यावेळी पुढल्या वर्षी सगळं ठीकठाक होईल, व्यवस्थित होईल अशी आशा-अपेक्षा आहे आणि ईश्वरचरणी प्रार्थना देखील आहे की सगळं नीट होऊ दे. आज महाराष्ट्रामधून असंख्य ठिकाणांवरून तांड्याच्या तांडे बाहेर पडतील आणि ते शहरांकडे येतील. शहराची परिस्थिती आता आपण बघतोच आहोत. आणि अशा सगळ्या महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा उत्सव साजरा करणं हे मला पटलं नाही, माझी आपल्याला देखील नम्र विनंती आहे.

आपल्याला काही काळी दिवाळी साजरी नाही करायची आहे, परंतु त्या उत्साहाला कुठेतरी आपण आवर घालणं आवश्यक आहे. फटाके फोडताना, रोषणाई करताना कुठेतरी आपण आवर घालणं, स्वतःलाच आवर आवश्यक आहे. आपण सगळे महाराष्ट्राचे नागरिक आहोत, महाराष्ट्रावरती आपलं प्रचंड प्रेम आहे, सर्वांचंच प्रेम आहे.

आणि महाराष्ट्रामधला नागरिक अशा प्रकारे होरपळत असताना आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावरती उत्सव साजरा करायचा हे काही मला पटत नाही, आपल्यालाही नाही पटलं पाहिजे. आणि म्हणून आपण या दिवाळीला आपण सर्वांनीच, अर्थात कंदील लावावेत, फराळ वाटावा, सगळ्या गोष्टी कराव्यात, परंतु रोषणाई करणं, फटाके फोडणं या गोष्टींना आवर घालावा एवढीच फक्त मला आपल्याला विनंती करायची आहे.

Raj Thackeray
Congress MP controversy : खासदार प्रतिभा धानोरकर यांना चापट मारली? थेट राहुल गांधींकडे तक्रार : दिल्लीतील व्हिडिओ समोर आल्याने काँग्रेस नेता अडचणीत...

यावेळी राज ठाकरेंनी मनसेसह पुढल्या वर्षी पुन्हा एकदा आपण जोरात ही दिवाळी, दीपोत्सव आपण साजरा करूया. तोपर्यंत एवढंच सांगण्यासाठी म्हणून मी आजचा हा आपल्यासमोर मी आलो.परंतु येणाऱ्या या दिवाळी सणाला आपण सर्वांना माझ्यातर्फे, माझ्या पक्षातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा, असं राज ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.