Mahadevrao Mahdaik,Savkar Madnaik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : विधानपरिषदेसाठी महाडिकांनी पहिला डाव टाकला, सावकार मादनाईकांना भाजपमध्ये खेचणार

Legislative Council Elections : विधानसभा निवडणुकीत सावकर मादनाईक यांनी महायुती पुरस्कृत शाहू आघाडीचे उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा प्रचार करत शेतकरी संघटनेचे उमेदवार उल्हास पाटील यांच्या विरोधात प्रचार केला होता. त्यामुळे यड्रावकर यांचा विजय झाला.

Rahul Gadkar

Kolhapur News, 17 Jun : विधानसभा निवडणुकीत सावकर मादनाईक यांनी महायुती पुरस्कृत शाहू आघाडीचे उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा प्रचार करत शेतकरी संघटनेचे उमेदवार उल्हास पाटील यांच्या विरोधात प्रचार केला होता. त्यामुळे यड्रावकर यांचा विजय झाला.

यड्रावकर यांना निवडून आणण्यात मादनाईक यांनी मोठे योगदान दिले. त्यामुळे आता आमदार यड्रावकर यांनी विधान परिषदेसाठी मादनाईक यांना संधी देऊन तुम्ही शब्द पाळण्याची वेळ आली आहे. आता सर्वांनी मिळून मादनाईक यांना आमदार करूया, असा निर्धार माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केला.

जयसिंगपूर येथील एका खासगी कार्यक्रमात त्यांनी चार महिन्यापूर्वी हे भाष्य केलं होतं. पुढील वर्षी विधान परिषदेच्या निवडणूक होण्याची शक्यता आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील हे विधान परिषदेवर सदस्य आहेत. भाजपकडून या जागेसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.

नुकतेच राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी येणारी विधान परिषद ही भाजप (BJP) घेईल असा दावा केला आहे. त्यानंतर माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या माध्यमातून शिरोळ मधील सावकार मादनाईक यांना भाजपमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचाली गतिमान झाल्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यासंदर्भात भेट घेणार असल्याची माहिती आहे.

मादनाईक यांच्याबरोबर स्वाभिमानीचे अन्य काही पदाधिकारीही भाजप प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत शेट्टी यांची तिसऱ्या आघाडीची भूमिका न पटल्याने मादनाईक यांनी वेगळी चूल मांडत महायुतीला व पर्यायाने आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पाठबळ देण्याची भूमिका घेतली. शिरोळ तालुक्यात त्यांच्या या भूमिकेचा यड्रावकरांना मोठा फायदाही झाला.

माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या मध्यस्थीने मादनाईक यांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, मादनाईक यांच्या भाजप प्रवेशात गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांच्याबरोबरच माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यासह आणि काही नेत्यांमध्ये खलबते सुरू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT