Mahayuti News : गेल्या 5 ते 6 वर्षांपासून रखडलेली महामंडळ समित्यांच्या नियुक्ती येत्या महिना दीड महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संदर्भात महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली आहे. त्यामुळे महामंडळावरील अध्यक्ष, सचिव आणि समित्यावरील पदासाठी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकार्यांना आपला हुकमी एक्का तयार ठेवावा लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेची निवडणूक पार पडताच महामंडळावरील नियुक्ती करण्यात येणार आहेत.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर कार्यकर्त्यांना विविध समित्या आणि महामंडळावरील पदाचे वेध लागले होते. मात्र, विधानसभा निवडणूक लागल्यानंतर पुन्हा महायुतीचे सरकार आले. निवडणुकीत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विविध पदाचे आमिष दाखवण्यात आले होते. मात्र महापालिका जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर या पदाची निवड होईल अशी चर्चा होती.
जिल्हा परिषद महापालिका निवडणूक झाल्यानंतर ही कार्यकर्त्यांना महामंडळावरील पदांच्या नियुक्तीचे वेध लागले होते. अखेर राज्य सरकारकडून यासंदर्भात काही प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली. या सर्व निवडणुकीदरम्यान महायुतीच्या नेत्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना अनेक आश्वासने दिली आहेत. काही पदाधिकाऱ्यांना तर महामंडळावर वर्णी लागणार,असा शब्द दिला आहे.
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गरज होती, त्यावेळी राबवून घेतले. पण कार्यकर्त्यांची वेळ आल्यानंतर त्यांना वाट पाहावी लागली. त्यामुळे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आक्रोश होता. नुकतीच मंत्री समितीच्या मंत्र्यांची बैठक मंगळवारी दादा भुसे यांच्या सरकारी बंगल्यावर झाली. या बैठकीला शिंदेंच्या शिवसेनेकडून दादा भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपकडून जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तर अजित पवार गटाकडून अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते
या बैठकीत ज्या मंत्र्याकडे ज्या विभागाचे खाते आहे त्या महामंडळातील पदे राहतील. असा निर्णय घेण्यात आला. यात शिंदे गटाकडे नगरविकास, गृहनिर्माण, उद्योग, सामाजिक न्याय आदी महत्त्वाची खाती असल्याने म्हाडा, सिडको आदी महत्त्वाची महामंडळे आणि प्राधिकरणाचे अध्यक्षपद शिंदेंच्या शिवसेनेकडे असतील. उपाध्यक्ष आणि सदस्य ही पदे महायुतीच्या तीन पक्षांत विभागली जातील.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर भाजपचे वर्चस्व राहणार असल्याची शक्यता आहे. या देवस्थान समितीवर भाजपचा अध्यक्ष होण्याची दाट शक्यता आहे. विधी आणि न्याय विभाग याचा कारभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.