Gokul Politics : फडणवीस- शिंदेचं बिनसलं? साताऱ्यानंतर गोकुळच्या राजकारणात शिंदेंच्या शिवसेनेला गृहीत न धरण्याचे संकेत

Fadnavis Shinde conflict latest news : साताऱ्यातील घडामोडीनंतर फडणवीस आणि शिंदे यांच्यात तणाव वाढल्याचे संकेत. गोकुळच्या राजकारणात शिंदेसेनेला डावलले जात असल्याची चर्चा.
eknath shinde Devendra Fadnavis
eknath shinde Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये दरी निर्माण झाल्यानंतर आता कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या राजकारणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधील दरी रुंदावत चालली आहे. गोकुळ मधील राजकारणामुळे पुन्हा एकदा यांचे मतभेद समोर आल्याचे चित्र आहे.

गोकुळ दूध संघावर प्रशासक येऊ नये यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह शिवसेनेचे नेते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान संघावर कोणत्याही परिस्थितीत प्रशासक येणार असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे.

eknath shinde Devendra Fadnavis
Vidhan Parishad Candidate NCP : सुनेत्रा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटल्या, शेवटच्या क्षणी सुत्रं फिरली! राष्ट्रवादीकडून 'या' नेत्याला उमेदवारी फिक्स?

गोकुळ दूध संघावर महायुतीची सत्ता, मंत्र्यांचा मुलगा अध्यक्ष असूनही जर प्रशासक येत असेल तर शिंदे सेनेला गृहीत धरू नका, अशी भुमिका मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्याच्या सूचना जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. गोकुळ'मध्ये महायुतीची सत्ता, महायुतीतील मंत्र्यांचा मुलगा अध्यक्ष तरीही गोकुळमध्ये प्रशासकांची नियुक्ती कशासाठी केली जात आहे?

महायुतीची सत्ता असूनही 'गोकुळ'मध्ये प्रशासक येणार असतील, तर आम्हाला आमचा योग्य पर्याय शोधावा लागेल, अशी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आपली भूमिका व्यक्त करा, असा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.

'गोकुळ'ची निवडणूक प्रक्रिया तत्काळ सुरू करावी. प्रशासकांऐवजी महायुतीतील संचालकांनाच मुदतवाढ मिळावी, यासह गोकुळच्या विविध मागण्यासांठी मुंबईत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर 'गोकुळ'मधील महायुतीचे पदाधिकारी आणि इतर संचालकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दरम्यान, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांना 'गोकुळ'मध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत विस्तृत माहिती दिली. यावर 'गोकुळ'मध्ये महायुतीची सत्ता आहे.

eknath shinde Devendra Fadnavis
Nandurbar Election News: खांडबारात भरत गावित पॅनल विजयी; सरपंचपदी दिपाली गावित, आजी-माजी आमदारांच्या पॅनलला धक्का

अध्यक्ष महायुतीचाच असताना संचालक मंडळाऐवजी प्रशासकांची नियुक्ती कशासाठी केली जात आहे? सर्व जण एकसंध असतील, तर प्रशासकांची गरज नाही. 'गोकुळ'मध्ये यापुढेही महायुतीचीच सत्ता राहील यात दुमत नाही. देशात, राज्यात, जिल्ह्यात महायुतीची सत्ता आहे. 'गोकुळ'मध्येही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे पॅनेल करून एकसंघपणे निवडणूक लढविण्यासाठी तयारी करा. तेथे महायुतीची सत्ता येईल, यासाठी सर्व जण शर्थीचे प्रयत्न करूया. मात्र, महायुतीचीच सत्ता असणाऱ्या गोकुळमध्ये प्रशासक कशासाठी? असा सवालही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com