ajit pawar, eknath shinde, devendra fadanvis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahayuti Seat Distrubution : महायुतीचे अखेर ठरलं; उरलेल्या 6 जागा मिळणार 'या' पक्षाला ?

Sachin Waghmare

Mumbai News : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी झाला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून 3 मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास चार दिवसांचा कालावधी राहिला असताना महायुतीचे जागावाटप जवळपास ठरले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ वगळता अन्य सहा जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

महायुतीमधील जागावाटपावरून गेल्या काही दिवसांपासून भाजप (Bjp), शिवसेना (Shivsena) शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) अजित पवार गटात रस्सीखेच पाहवयास मिळत होती. आतापर्यंत भाजपने २७, शिवसेना शिंदे गटाने दहा तर राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. (Mahayuti Seat Distrubution News)

आतापर्यंत एकूण ४२ जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. उर्वरित सहा जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आल्या असल्याने त्यांच्याकडून येत्या दोन दिवसांत सर्व उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागेल आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या एक जागेवरील उमेदवार ठरला नाही.

महायुतीतील अद्याप उमेदवार जाहीर न करण्यात आलेल्या 6 जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना लढवणार असल्याचे समजते. गेल्या काही आठवड्यांपासून उर्वरित जागांवर महायुतीमध्ये खलबतं सुरू आहेत. खासकरून नाशिकच्या जागेचा पेच अद्याप मिटलेला नाही. मात्र, उर्वरित सर्व जागा शिंदेंची शिवसेना लढेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दक्षिण मुंबईतून लोकसभेसाठी भाजपचे राहुल नार्वेकर इच्छुक आहेत, मात्र त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढावं, अशी शिवसेनेच्या नेत्यांची मागणी आहे. राहुल नार्वेकर भाजपच्या चिन्हावर लढण्याबाबत ठाम आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांना मैदानात उतरवले आहे. विशेष म्हणजे गजानन कीर्तिकर ठाकरे गटात असतानादेखील अमोल कीर्तिकर यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, ठाकरेंच्या अमोल कीर्तिकरांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

पालघरमधून विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचे नाव चर्चेत आहे. ते शिवसेना शिंदे गटाकडून रिंगणात उतरणार आहेत. शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे मतदारसंघात अद्याप महायुतीचा उमेदवार घोषित झालेला नाही. ठाण्यात प्रताप सरनाईक आणि नरेश म्हस्केंच्या नावाची चर्चा सुरू असून, सरनाईक याचं पारडं जड असल्याचे बोलले जात आहे. महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटल्याने लवकरच उमेदवाराची घोषणा होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

R

SCROLL FOR NEXT