Mahesh Kothe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur City North : सस्पेन्स संपला; ‘सोलापूर शहर उत्तर’मध्ये रंगणार विजयकुमार देशमुख विरुद्ध महेश कोठे सामना...

Maharashtra Assembly Election 2024 : महेश कोठे यांना पुढील तयारी करता यावी, यासाठी त्यांच्या नावाने ए बी फार्म निश्चित झालेला आहे. महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत येत्या सोमवारी (ता. 28 ऑक्टोबर) कोठे हे फार्म भरणार आहेत

Vijaykumar Dudhale

Solapur, 24 October : महाविकास आघाडीचे जागा वाटप काही मतदारसंघावरून अडले आहे, त्यामुळे कोणता मतदारसंघ कोणाला मिळणार, याची शाश्वती नाही. मात्र, महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पहिली यादी जाहीर केली खरी मात्र त्यात काही दुरुस्ती असल्याचे सांगितले.

महविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महेश कोठे यांना उमेदवारी जाहीर केली आहेत, त्यामुळे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा सस्पेन्स संपला आहे.

सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून (Solapur City North Constituency) महायुतीकडून विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ते गेली चार टर्म सोलापूर शहर उत्तरचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण निवडणूक लढवणार, याची उत्सुकता सोलापूरमध्ये असतानाच शेखर माने यांनी कोठे यांच्या उमेदवारीबद्दल माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक शेखर माने यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kothe) यांची उमेदवारी शरद पवार आणि जयंत पाटील यांनी निश्चित केली आहे.

महेश कोठे यांना पुढील तयारी करता यावी, यासाठी त्यांच्या नावाने ए बी फार्म निश्चित झालेला आहे. महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत येत्या सोमवारी (ता. 28 ऑक्टोबर) कोठे हे फार्म भरणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

दरम्यान, सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून यापूर्वी विजयकुमार देशमुख आणि महेश कोठे यांच्यात २००९ मध्ये सामना झाला होता. त्या निवडणुकीत देशमुख हे १० हजार ९० मतांनी निवडून आले होते. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर सपाटे यांनी बंडखोरी केली होती. त्यांनी तब्बल १४ हजार ६२४ मते घेतली, त्यामुळे सपाटे आणि कोठे यांच्यातील मतविभागणीचा फायदा देशमुख यांना झाला होता, त्यामुळे यंदाही सामना दुहेरी होणार की तिरंगी याकडे सोलापूरचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT