Sudhir kharatmal-Mahesh Kothe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur NCP : सुधीर खरटमल यांच्यासोबतच्या वादावर महेश कोठेंनी सोडले मौन; म्हणाले, ‘नेहमी मीच टार्गेट का?’

Dispute In Mahesh kothe-Sudhir Kharatmal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सोलापूर शहरात काहीही घडले तरी माझे नाव पुढे येते. मला टार्गेट केले जाते. काहीही संबंध नसताना मला विनाकारण वादात ओढले जाते.

Vijaykumar Dudhale

Solapur, 03 September : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दिलेल्या राजीनाम्याशी माझा काहीही संबंध नाही. माझा काडीचीही संबंध नसताना या प्रकरणात मला ओढण्यात आले आहे.

उलट खरटमल यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी त्यांची मनधरणी करणार असून वरिष्ठांनी त्यांचा राजीनामा स्वीकारू नये, अशी विनंती करणार आहोत, असे माजी महापौर महेश कोठे यांनी खरटमल वादावर स्पष्टीकरण दिले.

सुधीर खरटमल (Sudhir kharatmal) यांनी रविवारी रात्री (ता. 01 सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन वादावर स्पष्टीकरण दिले. काही दिवसांपूर्वी महेश कोठे (Mahesh Kothe) आणि सुधीर खरटमल यांच्यामध्ये शाब्दीक चकमक झाली होती. त्यानंतर खरटमल यांनी राजीनामा दिल्याची चर्चा रंगली होती. त्यावर कोठे यांनी भाष्य केले.

महेश कोठे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सोलापूर शहरात काहीही घडले तरी माझे नाव पुढे येते. मला टार्गेट केले जाते. काहीही संबंध नसताना मला विनाकारण वादात ओढले जाते. सुधीर खरटमल यांच्या राजीनाम्याशी माझा काहीही संबंध नाही, तरीही राजीनाम्याच्या प्रकरणात माझे नाव कसे समोर आले, याचे आश्चर्य वाटते.

खरटमल यांच्या राजीनाम्याबाबत प्रदेश प्रवक्ते ॲड. यू. एन. बेरिया म्हणाले, सुधीर खरटमल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा स्वखुशीने राजीनामा दिला आहे. खरटमल यांचा राजीनामा मंजूर करण्यात येऊ नये, अशी विनंती आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही गटबाजी नाही.

सुधीर खरटमल यांचा महेश कोठे किंवा तौफिक शेख यांच्याशी कोणताही वाद झालेला नाही. खरटमल यांनी स्वखुशीने राजीनामा दिलेला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष खरटमल यांचा राजीनामा मंजूर करण्यात येऊ नये, अशी विनंती आम्ही वरिष्ठ नेत्यांकडे करणार आहोत, असेही बेरिया यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सोलापूर शहर उत्तर, दक्षिण सोलापूर व सोलापूर शहर मध्य या तीनही विधानसभा मतदारसंघासाठी 13 इच्छुकांचे अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आले आहेत. विधानसभा इच्छुकांचे येत्या 5 सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. इच्छुकांच्या अर्जाचा प्रस्ताव प्रदेश कमिटीकडे पाठविण्यात येणार आहे, असेही बेरिया यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT