Solapur NCP : महेश कोठे राष्ट्रवादीत नाराज?; पक्षाच्या कार्यक्रमांमधून गायब, असहकार्याची भावना

Mahesh Kothe : महेश कोठे गेल्या काही दिवसांपासून म्हणजे शिवस्वराज्य यात्रा शहरात येऊन गेल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर आहेत.
Mahesh Kothe
Mahesh KotheSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 27 August : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी महापौर महेश कोठे हे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. तुतारीसाठी शहरात अनुकूल वातावरण असतानाही कोठे यांना पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याची कुजबूज आहे. उलट सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून ऐन वेळी धर्मराज काडादी हेच उमेदवार राहतील, अशी चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेते आपल्याला धक्का देण्याची तयारी करत असल्याची चाहूल लागताच महेश कोठे (Mahesh Kothe) यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांची एक गोपनीय बैठक झाली. त्या बैठकीत महेशअण्णा, तुम्ही सोलापूर (Solapur) शहर उत्तर मतदारसंघाऐवजी सोलापूर शहर मध्य मतदासंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवावी, अशी विनंती महेश कोठे यांना कार्यकर्त्यांनी केल्याचे समजते. आता महेश कोठे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महेश कोठे यांच्याबाबत शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेतही काहीसा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. त्या कार्यक्रमाला महेश कोठे आणि त्यांचे समर्थक कोणीही उपस्थित नव्हते. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharadchandra Pawar Party) सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांना पत्रकारांनी कोठे यांच्याबाबत विचारले, त्या वेळी ‘ते आले नाहीत, मी त्यांना फोनही करायचा विसरलो,’ असे उत्तर त्यांनी दिले.

Mahesh Kothe
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सरकारच्या वतीने भाजप नेत्याने मागितली जाहीर माफी

सोलापूर शहर उत्तर मतदारसघांत पद्मशाली किंवा लिंगायत समाजाचा चेहरा चालतो. कोठे यांना सोडले, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विजयाच्या जवळपास जाणारा दुसरा कोणता चेहरा दिसत नाही. सोलापूरच्या नाराजीनाट्यात वरिष्ठ नेत्यांनी जातीने लक्ष घालणे गरजेचे आहे.

दरम्यान, महेश कोठे गेल्या काही दिवसांपासून म्हणजे शिवस्वराज्य यात्रा शहरात येऊन गेल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर आहेत. राज्य सरकारच्या आज झालेल्या निषेधाच्या कार्यक्रमातही महेश कोठे दिसून आले नाहीत, त्यामुळे महेश कोठे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे.

Mahesh Kothe
Ranjitshinh Mohite Patil : रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार का?; विजयदादांनी दिले हे उत्तर....

महेश कोठे यांना समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेण्याचा सल्ला दिला आहे. आता तो सल्ला कोठे अंमलात आणतात का? की थेट शरद पवार यांच्यासोबत संबंध असल्याने त्यांची नाराजी पक्षश्रेष्ठींकडून दूर केली जाते, हे पाहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com